टेंबवली बस स्टॉप ते मोंडतर रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरण या कामाचे मंत्री नितेश राणेंच्या हस्ते भूमिपूजन
टेंबवली बस स्टॉप ते मोंड तर रस्ता या रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरण या कामाचा भूमिपूजन सोहळा मत्स्य व्यवसाय व बंदर विकास मंत्री नामदार नितेश राणे यांच्या हस्ते करण्यात आला.
या रस्त्यासाठी तीन कोटी 66 लाख रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे. या रस्त्याच्या भूमिपूजन प्रसंगी माजी आमदार अजित गोगटे टेंबवली गावचे सरपंच हेमंत राणे, उपसरपंच स्नेहल घाडी शिवसेनेचे तालुकाप्रमुख विलास साळस्कर प्रकाश राणे सदाशिव ओगले सुनील पारकर मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेचे कार्यकारी अभियंता भोसले, उपअभियंता भोसले, ओमटेक कंपनीचे समीर पेडणेकर सुशील लोके, तालुकाध्यक्ष राजेंद्र शेट्ये, नंदू देसाई दिलीप कदम, दयानंद पाटील, योगेश पाटकर ,गावचे ग्रामसेवक ग्रामपंचायत सदस्य व अन्य उपस्थित होते.