उबाठा शिवसेनेला जय महाराष्ट्र करत देवगड नगरसेवक तारी बंधू भाजपात दाखल

 

 

देवगड (प्रतिनिधी)

 

उबाठा शिवसेनेला जय महाराष्ट्र करत देवगड नगरसेवक तारी बंधू भाजपात दाखल

मंत्री नितेश राणे व प्रदेश कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला ओरोस येथे पक्ष प्रवेश

नगरसेवक निवृत्ती(बुवा) तारी, संतोष तारी यांचा भाजपात प्रवेश

पालकमंत्री नितेश राणे यांनी आज उबाठा पक्षाला देवगड नगरपंचायत मध्ये जोरदार झटका दिला. वॉर्ड क्रमांक ११ चे नगरसेवक निवृत्ती उर्फ बुवा तारी, व वार्ड क्रमांक ८ चे नगरसेवक संतोष तारी यांनी भारतीय जनता पक्षात आपल्या असंख्य कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ओरोस येथील मेळाव्यात पक्ष प्रवेश केला. भाजप नेते खासदार नारायण राणे, प्रदेश कार्यकारी अध्यक्ष आमदार रवी चव्हाण, पालकमंत्री नामदार नितेश राणे, जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टी मध्ये हा पक्षप्रवेश केला.त्यामुळे देवगड नगरपंचायत मध्ये भारतीय जनता पार्टीचे या पक्षप्रवेशाने फार मोठी ताकद वाढली आहे. तर उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला फार मोठे खिंडार पडले आहे.

यावेळी नगरसेवक बुवा तारी, संतोष तारी यांचे समवेत विरेंद्र कुमठेकर सुबोध कांबळे बाबू वाडेकर राजा निकम अजिंक्य पेडणेकर रोहन घाडी अक्षय वेंगुर्लेकर स्वागत बांदेकर बाबू बांदेकर मनोज बांदेकर पिंटू जाधव दिनेश पाटील निलेश सावंत अशा उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी पक्ष प्रवेश केला.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *