कणकवली शिवसेना कार्यालयात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंती साजरी
कणकवली येथील शिवसेना ठाकरे पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंती साजरी करण्यात आली. यात उपस्थित पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी बाळासाहेबांना अभिवादन केले.
कणकवली विधानसभाप्रमुख सतीश सावंत यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या कार्याबाबत विचार मांडले. यावेळी तालुका प्रमुख कन्हैया पारकर, महिला जिल्हाप्रमुख नीलम पालव, महिला तालुका प्रमुख वैदेही गुडेकर, माधवी दळवी, रोहिणी पिळणकर, हेलन कांबळे, धनश्री मेस्त्री, राजू राठोड, अनुप वारंग, अजित काणेकर, तेजस राणे, योगेश मुंज, स्वप्नील पाटील, विलास गुडेकर, जितू कांबळे आदी उपस्थित होती. जयंती कार्यक्रमानंतर शिवसेना कार्यकर्त्यांनी उपजिल्हा रूग्णालयातील रूग्णांना फळ वाटप केले.