स्वच्छता अभियानातून कॅडेट्सची स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांना मानवंदना – सरपंच सौ संजना आग्रे

0 minutes, 3 seconds Read

 

कणकवली (प्रतिनिधी)

स्वच्छता अभियानातून कॅडेट्सची स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांना मानवंदना – सरपंच सौ संजना आग्रे

फोंडा स्टॅन्ड आणि हायस्कूलच्या एनसीसी कॅडेट्स कडून एस.टी. स्टँड परिसराची स्वच्छता !

स्वच्छता अभियान एक निमित्त मात्र आहे. प्रत्येकाने स्वतः पासून स्वच्छतेची कास जोपासली तर, आपला गाव- तालुका-जिल्हा आणि पर्यायांनी आपला देश, स्वच्छ राहील. स्वच्छतेचा संबंध थेट आरोग्याशी येत असल्याने, रोगमुक्त- सुदृढ परिसर राखण्यात आपला वाटा स्तुत्य राहील. एस.टी परिवाराने राष्ट्रीय कॅडेट कोर च्या साह्याने, बाळासाहेबांच्या विचारांना पुढे नेत, सार्वजनिक सुविधांची काळजी घेत, स्टॅन्ड स्वच्छ- सुंदर करण्यात आणि सेवा देऊन, त्यांना खरी मानवंदना दिली आहे. असे उद्गार फोंडाघाट सरपंच सौ संजना आग्रे यांनी काढले.

 

 

महामंडळाच्या स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त आयोजित स्वच्छता अभियानांतर्गत कार्यक्रमात त्या बोलत होत्या. यावेळी स्थानक प्रमुख संजय पवार, विभा. लेखाकार तानाजी करे, सहाय्यक एनसीसी ऑफिसर आर्या भोगले, मारुती लाड, अजिंक्य पोफळे इत्यादी उपस्थित होते.

 

 

सुमारे तीन तास चाललेल्या अभियानाचे नेतृत्व कॅडेट प्रमुख वृंदा मोरे, दिव्यांका जोईल, सर्वेश लाड, ऋतुराज रावराणे यांनी केले. सर्व कॅडेट्सनी फोंडाघाट एसटी स्टँड परिसर कागद बाटल्या, कचरा , इत्यादी स्वच्छ करून सुंदर चकाचक केला. यावेळी एनसीसी तर्फे सर्व ग्रामस्थ आणि प्रवाशांना रिक्षा चालक यांना कचरा, कागद, प्लॅस्टिक पिशव्या, रॅपर्स इत्यादी कचरा बॉक्स मध्ये टाकून, आपला स्टॅन्ड परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले. मुलांना अल्पोपहाराची सोय स्थानक प्रमुख पवार यांनी केली.या उपक्रमाबद्दल एनसीसी कॅडेटस चे परिसरात कौतुक होत आहे.

 

 

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *