देवगड (प्रतिनिधी)
देवगड येथे पोषण भी पढाई भी उपक्रमातुन अंगणवाडी सेविकांच प्रशिक्षण संपन्न
एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प कार्यालय देवगड व जिल्हा परीषद सिंधुदूर्ग व इंदोर निपसीड यांच्या संयुक्त विद्यमाने स्वामी समर्थ मंगल कार्यालय जामसंडे येथे पोषण भी पढाई भी उपक्रमातुन अंगणवाडी सेविकांचे प्रशिक्षण देवगड बाल विकास प्रकल्प अधिकारी बी.ए.होडावडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाले .
अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातुन बालकांचा सर्वांगीन विकास व बौद्धीक क्षमता वाढवणे , बाल शिक्षणात आवश्यक टिचींग लर्निग मटेरीयल तयार करून त्यांचा उत्कृष्टपणे वापर करणे , सक्षम अंगणवाडी केंद्र उभारणे हा या प्रशिक्षणाचा मुख्य उद्देश आहे .
हे प्रशिक्षण ३ दिवस म्हणजे १४ जानेवारी ते १६ जानेवारी २०२५ या कालावधीत संपन्न झाले .पहिल्या दिवशीय प्रशिक्षणात पोषण भी पढाई भी प्रशिक्षणाचा परीचय त्याची उद्दिष्टे,ECCE दिवसाच महत्त्व , पालकांचा सहभाग , o ते८ वयोगटातील बालकातील सर्वांगीन विकास बाबत मार्गदर्शन करण्यात आल . दुसऱ्या दिवशीच्या प्रशिक्षणात बालकांचा शारीरिक विकास ,पोषण आवश्यक गोष्टी, मुल्यमापन बाबत प्रशिक्षण तसेच १००० दिवसाचे महत्त्व स्तनपान शिशुपोषण याबाबत मार्गदर्शन तर तिसऱ्या दिवशी बालकांचा पोषन पढाई सोबत दिव्यांग बालकांच वर्गीकरण तसेच येणाऱ्या आव्हानांना सामोरे जाण्याबाबत प्रशिक्षण अंगणवाडी सेविकांना देण्यात आले .या प्रशिक्षणामध्ये झ्ळये बीट, मोंड बीट व पडेल १बीट व पडेल २ मधील १oo सेविका उपस्थित होते .
या प्रशिक्षण कालावधीत पहिल्या दिवशी सहाय्यक आयुक्त नागरगोजे , जिल्हा कार्यक्रम अधिकारी बा.क सोमनाथ रसाळ , तर दुसऱ्या दिवशी जिल्हा दिव्यांग समन्वयक वृषाली चेंदवणकर तर तिसऱ्या दिवशी बाल विकास प्रकल्प अधिकारी वैभववाडी वैशाली काकडे यांनी भेट देत मार्गदर्शन केले .
या प्रशिक्षणामध्ये एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प अधिकारी देवगड बी.ए. होडावडेकर, पर्यवेक्षिका मास्टर ट्रेनर सुवर्णा भगत व मनस्वी कांबळे तसेच प्रकल्पाच्या पर्यवेक्षिका पुजा सावंत , पर्यवेक्षिका राखी राणे , पर्यवेक्षिका प्रियांका कुमारी लाड , प्रथमेश घाडीगांवकर, दत्तप्रसाद सारंग आदी मान्यवर उपस्थित होते .
