देवगड (प्रतिनीधी)
.... तर आमच्या जमिनीत मारण्यात येणाऱ्या बोअरवेल साठी आमची हरकत ; जामसंडे परिसरातील ग्रामस्थांचे तहसीलदार व मुख्याधिकाऱ्यांना निवेदन
महाराष्ट्र शासनाच्या भूविज्ञान व खणीकर्म संचालनालय विभागाच्या कोल्हापूर प्रादेशिक कार्यालयाकडून गाव मौजे जामसंडे तालुका देवगड परिसरात प्रस्तावित बॉक्साईड खनिजांचे नमुने घेण्यासाठी आम्ही पुढे सही करणाऱ्या सर्व ग्रामस्थांच्या जमिनीमध्ये उत्खनन व सर्वेक्षण करण्यास असल्याची नोटीस मुख्याधिकारी नगरपंचायत देवगड जामसंडे यांचे मार्फत आम्हाला देण्यात आली होती.
सदर नोटीस नुसार 14 जानेवारी रोजी नगरपंचायत कार्यालयाचे बैठक घेण्यात आली होती. त्यावेळेस आम्ही सर्व सही करणारे ग्रामस्थ उपस्थित होतो. खनीकर्म विभागाच्या वतीने हजर असलेल्या कोल्हापूर उपसंचालक अधिकारी श्री प्र.त कोरे यांनी ग्रामस्थांच्या जमिनीमध्ये बोअर मारणार असल्याचे सांगितले आहे. आम्हा जामसंडे परिसरातील सर्व ग्रामस्थांची आमच्या जमिनीत अनधिकृत बोअर मारण्यास व सर्वेक्षण करण्यास तीव्र हरकत आहे. अशा आशयाचे निवेदन देवगड जामसंडे नगरपंचायत मुख्याधिकारी तसेच तहसीलदार देवगड यांच्याकडे जामसंडे येथील ग्रामस्थांच्या वतीने देण्यात आले आहे.

