देवगड तालुक्यात सुमारे ५ लाखाचे नुकसान ; देवगड तहसीलदार यांनी केली नुकसानीची पाहणी ;  घरावर कोसळले झाड ; जुनाट वटवृक्ष पडल्याने विद्युत पुरवठा खंडित ; हा रस्ता झाला बंद ; रामेश्वर प्रतिष्ठानने केला रस्ता वाहतुकीस सुरू

0 minutes, 0 seconds Read

देवगड(प्रतिनिधी)२१ जुलै २०२४

 

देवगड तालुक्यात सुमारे ५ लाखाचे नुकसान ; देवगड तहसीलदार यांनी केली नुकसानीची पाहणी ;  घरावर कोसळले झाड ; जुनाट वटवृक्ष पडल्याने विद्युत पुरवठा खंडित ; हा रस्ता झाला बंद ; रामेश्वर प्रतिष्ठानने केला रस्ता वाहतुकीस सुरू

 

देवगड तालुक्यात शनिवारी व रविवारी वादळी वाऱ्यासह झालेल्या अतिवृष्टीत तालुक्यात ठिकठिकाणी पडझड होऊन सुमारे ४ लाख ६० हजार ५०० रुपयांचे नुकसान झाले आहे.
तालुक्यात ४० मिमी पावसाची आहे. तालुक्यात पावसाचा आता कहर झाला आहे. मिठबाव येथे शनिवारी रात्री दहाच्या सुमारास वडाच्या झाडाच्या फांद्या तुटून विद्युत वाहिनीवर कोसळल्याने विद्युत वाहिनीच्या तारा तुटल्याने वीज पुरवठा खंडित झाला तसेच दहिबाव मिठबाव हा मार्ग देखील बंद होता. रामेश्वर प्रतिष्ठानच्या वतीने झाडाची तात्काळ कटिंग करून वाहतुकीस मार्ग खुला केला. मात्र विद्युत पुरवठा रविवारी दुपारी दोन वाजेपर्यंत खंडित झाला होता.
देवगड तालुक्यात मुसळधार अतिवृष्टीमुळे अनेक ठिकाणी पडझड होऊन सुमारे ४ लाख ५० हजार ५०० रुपयाचे नुकसान झाले आहे.यामध्ये सर्वाधिक नुकसान देवगड कट्टा येथे झाले आहे या नुकसानग्रस्त भागाची देवगड तहसीलदार संकेत यमगर यांनी पाहणी केली. तालुक्यातील देवगड कट्टा येथील महेश शंकर भाबल यांच्या राहत्या घरावर कलम कोसळून सुमारे ३ लाख ७८ हजार रुपयांचे तर तेथीलच प्रशांत परशुराम दरवेश यांच्या घराची पडवी पडवीची भिंत कोसळून ३० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे चांदोशी येथील मनोहर धोंडू चांदोसकर यांच्या घरावर कलम कोसळून सुमारे ५० हजार, तर टेंबवली नाईकवाडी येथील फरीदा अख्तर नाईक यांच्या घराच्या छपराचे २५००/- चे नुकसान झाले आहे असे एकूण मिळून तालुक्यात ४ लाख ६० हजार ५०० रुपयांचे नुकसान झाले आहे .

शनिवारी रात्री १० वाजता मिठबाव मार्गावरील वडाच्या झाडाच्या मोठ्या फांद्या विद्युत वाहिनीवर पडल्याने विद्युत वाहिनीच्या तारा तुटून विद्युत पुरवठा खंडित झाला. तसेच दहिबाव मिठबाव मार्ग देखील बंद झाला होता. मिठबाव रामेश्वर प्रतिष्ठानचे अध्यक्ष तथा सरपंच भाई नरे यांनी तात्काळ रामेश्वर प्रतिष्ठानच्या सदस्यांना बोलावून रात्रीचं वडाचे झाड कटिंग करून वाहतुकीस खुला केला. मात्र विद्युत पुरवठा सुरळीत करण्यासाठी वीज कर्मचाऱ्यांची कसरत सुरू होती दुपारी रविवारी दुपारी २ नंतर विद्युत पुरवठा सुरळीत सुरू करण्यात वीज वितरणच्या कर्मचाऱ्यांना यश आले.

किंजवडे बाईटवाडी येथील दोन महिन्यापूर्वी बनविलेला रस्ता या मुसळधार अतिवृष्टीत वाहून गेला आहे. किंजवडे बाईतवाडी हा रस्ता व्हावा यासाठी गेली कित्येक वर्ष मागणी होती मात्र यावर्षी रस्त्याचे काम पूर्ण झालं आणि पहिल्याच पावसात हा रस्ता वाहून गेल्याने ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली आहे.
तालुक्यात सतत कोसळणाऱ्या पावसामुळे जनजीवन पुर्णतः विस्कळीत झाले आहे.शासनाने अजूनही काही अतिवृष्टीच्या इशारा दिलेलाच आहे.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *