Oplus_16908288

आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त देवगड येथे भव्य मोफत आरोग्य शिबिर

0 minutes, 6 seconds Read

 

देवगड (प्रतिनिधी)

आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधून रविवार दिनांक ८ मार्च २०२६ रोजी सकाळी ८.०० ते दुपारी १२.०० या वेळेत देवगड मेडिकल फाउंडेशन , देवगड येथे भव्य मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर Maharashtra Orthopaedic Association, IMA Kankavali, Devgad व देवगड मेडिकल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात येत आहे.
महिलांच्या आरोग्याविषयी जागरूकता निर्माण करणे व ग्रामीण भागातील रुग्णांना तज्ज्ञ वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देणे हा या शिबिराचा मुख्य उद्देश आहे. या शिबिरात विविध क्षेत्रातील तज्ज्ञ डॉक्टर रुग्णांची तपासणी करणार आहेत.
यामध्ये –
डॉ. तन्मय आठवले (अस्थिरोग तज्ञ)
डॉ. महेंद्र आचरेकर (शल्यचिकित्सक)
डॉ. अर्पिता आचरेकर (स्त्रीरोग तज्ञ),
डॉ. रिया जैन आठवले (फिजिशियन)
तसेच डॉ. ज्ञानेश्वर केदार (नेत्ररोग तज्ञ) उपस्थित राहणार आहेत.
शिबिरात खालील तपासण्या पूर्णपणे मोफत केल्या जाणार आहेत – बोन मिनरल डेन्सिटी (BMD), पेरिफेरल न्यूरोपॅथी तपासणी, ईसीजी (ECG), पल्मोनरी फंक्शन टेस्ट (PFT), रक्तातील साखर तपासणी, HbA1c आवश्यकतेनुसार लिपिड प्रोफाइल. आवश्यक असल्यास DR System वर एक्स-रे तपासणी ५०% सवलतीत करण्यात येणार आहे.
याशिवाय, NAB Eye Hospital, Devgad यांच्या मार्फत मोफत नेत्र तपासणी केली जाईल. मोतीबिंदू शस्त्रक्रिया २०% सवलतीत तसेच चष्म्यावर ५०% सूट देण्यात येणार आहे.
देवगड मेडिकल फाउंडेशनने आतापर्यंत महाराष्ट्रातील विविध भागांत १००० हून अधिक मोफत आरोग्य शिबिरे यशस्वीरित्या आयोजित केली असून हजारो रुग्णांना याचा लाभ झाला आहे.

डॉ. सुनील आठवले व डॉ. मंजुषा आठवले (संचालक, DMF Healthcare Pvt. Ltd.) यांनी सर्व महिलांनी व नागरिकांनी या शिबिराचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे.

📍 स्थळ: देवगड मेडिकल फाउंडेशन, एसबीआय बँकेसमोर, ता. देवगड, जि. सिंधुदुर्ग – ४१६६१३
📞 अधिक माहितीसाठी संपर्क: ७३८२८२१००० / ७३८२८२२०००
महिला दिन साजरा करूया – आपल्या आरोग्याची काळजी घेऊन! 

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *