विशाल परब यांचे मतदान ओळखपत्र आहे चराठा गावचे,विधानसभा मतदार संघा बाहेरील म्हणणाऱ्यासाठी चपराक
सावंतवाडी प्रतिनिधी २० जुलै २०२४
महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेची निवडणूक जसजशी जवळ येत आहे तसतशी आरोप प्रज्ञारोप तसेच इच्छुक उमेदवारांची मोठी भाऊ गर्दी होत आहे.इच्छुक उमेदवार आपापल्या परीने आपल्याला उमेदवारी मिळण्यासाठी अतोनात परिश्रम घेत आहेत.तसेच आपला जनसंपर्क जास्तीत जास्त कसा वाढेल याकडे इच्छुक उमेदवारांचा लक्ष आहे.सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी विधानसभा मतदारसंघांमध्ये विधानसभेची निवडणूक लढवण्यासाठी भाजपकडून अनेकजण इच्छुक आहेत.यामध्ये माजी आमदार राजन तेली,युवा मोर्चा भाजपचे महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष विशाल परब,माजी नगराध्यक्ष संजू परब यांची नावे आघाडीवर आहेत.विशाल परब हे आपला जनसंपर्क वाढवण्यासाठी ठीक ठिकाणी मतदारांच्या गाठीभेटी घेत असूनअनेक सामाजिक उपक्रमही राबवत आहेत.यामध्ये अतिवृष्टी मधील नुकसानग्रस्तांना मदत,वारकरी सांप्रदाय करिता मदत,गरजू रुग्णांना मदत, शालेय विद्यार्थ्यांना मदत, त्याचप्रमाणे बाजारात भाजीपाला फळ विक्री करून उदरनिर्वाह करणाऱ्या व्यापाऱ्यांसाठी मदत अशा अनेक उपक्रमांचा सहभाग आहे.दोन दिवसांपूर्वीच भाजपच्या झालेल्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या बैठकीमध्ये साधक बाधक गरमागरम चर्चा झाली.
या बैठकीनंतर विशाल परब हे सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाच्या बाहेरील असल्याने त्यांनी सावंतवाडी मतदारसंघांमध्ये लुडबुड करू नये असा सूर आळवण्यात आला.आता विशाल प परब यांनी सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील सावंतवाडी तालुक्यातील चराठा या गावचे मतदान ओळखपत्र प्रसिद्ध करून आपण स्थानिकच आहे याचा भक्कम पुरावा दिल्याने विशाल परब हे सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाच्या बाहेरील आहेत असं म्हणणाऱ्यांसाठी ही एक चपराक म्हटली जात आहे.भाजपमध्ये सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातून आमदारकीची निवडणूक लढवण्यासाठी अनेकजण इच्छुक असले तरी युतीही अजून पर्यंत भक्कम असल्याने विद्यमान आमदार तथा शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांना उमेदवारी मिळणार हे निश्चित मानले जात असल्याने अनेक इच्छुकांचे मनसुबे धुळीला मिळू शकतात.मात्र युती मध्ये दुरावा निर्माण झाल्यास भाजपने एकला चलो चा नारा दिला तर भाजपकडून ज्या व्यक्तीला पक्षाची अधिकृत उमेदवारी दिली जाईल त्याच उमेदवाराचा प्रचार आम्ही करू अशीही चर्चा सर्वसामान्य कार्यकर्त्यांमध्ये जोर धरत आहे.
