देवगड (प्रतिनिधी)दि. १९ जुलै २०२४
सिंधुदुर्ग पर्यटन जिल्ह्या असूनही मुख्यमंत्री तीर्थक्षेत्र दर्शन यात्रेत स्थान नाही ; जगप्रसिद्ध कुणकेश्वर तीर्थक्षेत्राचा शासनाला पडला विसर
खासदार नारायण राणे पालकमंत्री रवींद्र चव्हाण आमदार नितेश राणे यांचे लक्ष वेधणार – सरपंच महेश ताम्हणकर
मुख्यमंत्री तिर्थदर्शन यात्रा या योजनेची मुख्यमंत्री यांनी घोषणा केली यानंतर देशातील १३९ तीर्थक्षेत्रांचा यात समावेश करण्यात आला. मात्र यामध्ये एकमेव पर्यटन जिल्हा असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याचा यात समावेश नाही. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यात दक्षिण कोकणची काशी म्हणून ओळखल्या जाणारे श्री क्षेत्र कुणकेश्वर हे जगप्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे. मात्र या योजनेत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुणकेश्वर तीर्थक्षेत्राचा नामोल्लेख नसल्याने कुणकेश्वर मधील ग्रामस्थांनी खंत व्यक्त केली आहे.
महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजने अंतर्गत ६० वर्षावरील जेष्ठ नागरिकांना मोफत तीर्थयात्रेचे सुविधा उपलब्ध केली आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी त्यांनी देशातील ७३ आणि महाराष्ट्रातील ६६ धार्मिक स्थळ अशी एकूण १३९ धार्मिक स्थळांची यादी तयार करण्यात आली आहे.

या योजनेत महाराष्ट्रातील
सिद्धिविनायक मंदिर ,सेंट जॉन द बॅप्टिस्ट चर्च मरोळ ,मॅगेन डेव्हिड सिनेगॉन भायखळा, महालक्ष्मी मंदिर,गोदाजी पाश्वत मंदिर,सेंट जॉन बॅप्टिस्ट चर्च, चैत्यभूमी दादर, नेसेट एलियाहू सिनेगॉग फोर्ट, अंग्यारी अग्निमंदिर, माउंट मेरी चर्च शार हरहमीम सिनेगॉग मज्जिद भंडार, ज्योतिबा मंदिर, मुंब्रादेवी मंदिर, भीमाशंकर ज्योतिर्लिंग मंदिर, संत तुकाराम महाराज समाधी मंदिर, वाळकेश्वर मंदिर, मलबार हिल, संत चोखामेळा समाधी पंढरपूर, महालक्ष्मी मंदिर कोल्हापूर, विश्व विपश्यना पॅगोडा गोराई ,संत सावतामाळी समाधी मंदिर अरण, जैन मंदिर कुंभोज, चर्च ऑफ अवर लेडी ऑफ हेल्थ, विठोबा मंदिर पंढरपूर, रेणुका देवी मंदिर माहूर ,सेंट अँड्रू चर्च वांद्रे, शिखर शिंगणापूर, श्री संत नामदेव महाराज देवस्थान,सेंट जॉन द बॅप्टिस्ट चर्च अंधेरी, तुळजाभवानी मंदिर तुळजापूर, संत एकनाथ समाधी पैठण, जैन स्मारके एलोरा लेणी, विघ्नेश्वर मंदिर ओझर, संत निवृत्तीनाथ समाधी त्रंबकेश्वर ,मुक्तिधाम, सप्तशृंगी मंदिर वणी, काळाराम मंदिर, गजपंथ, संत साईबाबा मंदिर शिर्डी, सिद्धिविनायक मंदिर सिद्धटेक, श्री क्षेत्र भगवानगड पाथर्डी, बल्लाळेश्वर मंदिर पाली, संत गजानन महाराज मंदिर शेगाव, श्री दत्त मंदिर औदुंबर, केदारेश्वर मंदिर, वैजनाथ मंदिर परळी, गणपतीपुळे,मार्लेश्वर मंदिर महाकाली देवी अष्टदजपूज्य रामटेक दीक्षाभूमी चिंतामणी कळंब आदी महाराष्ट्रातील तीर्थक्षेत्रांचा समावेश आहे.
समावेश नाही याची खंत ; पण समावेश करण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे विनंती करणार – सरपंच महेश ताम्हणकर

