मुकुंदराव फाटक नर्सिंग कॉलेजचा तृतीय वर्षाचा 100 टक्के निकाल
मुकुंदराव फाटक नर्सिंग कॉलेज देवगडचा जी.एन.एम च्या पहिल्या बॅचचा तृतीय वर्षाच्या अंतिम परिक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून या महाविद्यालयाचा निकाल 100 टक्के लागला आहे. सुनिता शांताराम एज्युकेशन ट्रस्ट संचलित मुकुंदराव फाटक नर्सिंग कॉलेज देवगड हे नर्सिंगमधील शिक्षण देणारे देवगड तालुक्यातील पहिलेच महाविद्यालय आहे. या महाविद्यालयामध्ये पहिल्याच बॅचमध्ये प्रवेश घेतलेले सर्वच्या सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
त्यामध्ये सानिका प्रमोद राणे या विद्यार्थीनीने 423 गुण मिळवत महाविद्यालयामध्ये प्रथम क्रमांक पटकावला आहे. तर तेजस्वीनी नितीन कणेरकर हिने 417 गुण मिळवून दुसरा तर रुद्रप्रताप नरेंद्र सिंग, विशाखा विलास जाधव व समिता मुरलीधर पेडणेकर या तीन विद्यार्थ्यांनी प्रत्येकी 404 गुण मिळवून तृतीय क्रमांक पटकावला आहे. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे चेअरमन माजी आमदार प्रमोद जठार यांनी अभिनंदन केले असून विद्यार्थ्यांना भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.