कणकवली मतदारसंघात आमदार नितेश राणेंची हॅट्रिक ; पुन्हा एकदा राणेपर्व ; आमदार नितेश ५८ हजार मताधिक्याने विजयी; भाजप कार्यकर्त्यांनी विजयाचा गुलाल उधळला…
कणकवली दि.२३ नोव्हेंबर (प्रतिनिधी)
कणकवली मतदारसंघात सलग तिसऱ्यांना प्रचंड मताधिक्याने विजयी होऊन आमदार नितेश राणे यांनी “हॅट्रिक” साधली आहे. उबाठाचे प्रतिस्पर्धी उमेदवार संदेश पारकर यांचा त्यांनी ५८ हजारापेक्षा अधिक मताधिक्याने पराभव केला आहे. राणे यांच्या विजयानंतर भाजप कार्यकर्त्यांनी गुलाल उधळून जल्लोष सुरू ठेवला आहे. कणकवली शहर तसेच तालुक्यात ठिकठिकाणी फटाक्यांची आतषबाजी केली.
कणकवली मतदारसंघात उबाठाचे संदेश पारकर हे चांगली लढत देतील अशी अपेक्षा होती. परंतु सर्वच बुथवर मताधिक्य घेऊन नितेश राणे यांनी आपल्या विजयाची पताका बुलंद केली आहे. मतमोजणीच्या पहिल्या फेरीपासूनच आमदार नितेश राणे आघाडीवर राहिले. शेवटच्या बुथ पर्यंत तसेच टपाली मतदानामध्येही श्री. राणे आघाडीवर राहिले आहेत.
