विधानसभा निवडणुकीतील महायुतीचे भाजपाचे उमेदवार नितेश राणे यांच्या विजयाचे आणि अभिनंदनांचे बॅनर विधानसभा निवडणुक निकाला आधीच राणेंच्या मूळ गावी वरवडे सह कणकवली विधानसभा मतदारसंघात झळकले आहेत. दोन टर्म आमदार राहिलेले नितेश राणे यांनी आपल्या आमदारकीच्या हॅट्ट्रिकसाठी तिसऱ्यांदा विधानसभा निवडणूक लढवली. विधानसभा निवडणुकीच्या निकालासाठी मतमोजणी उद्या २३ नोव्हेंबरला होणार आहे. कणकवली विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी सकाळी ८ वाजल्यापासून सुरू होणार आहे. अधिकृत निकाल दुपारी १२ वाजेपर्यंत हाती येण्याची शक्यता आहे.
मात्र स्वाभिमान प्रतिष्ठान वरवडेचे अचित कदम, सुभाष मालंडकर यांच्यासह अन्य भाजपा कार्यकर्त्यानी तत्पूर्वीच निकालाच्या आदल्या दिवशीच आज नितेश राणे यांच्या विजयी हॅट्ट्रिक साठी अभिनंदन अशा आशयाचे बॅनर नितेश राणे यांच्या मूळ गावी वरवडे सह सिंधुदुर्गात लावले आहेत.