घरांचा पत्ता नाही मात्र न.पं.घरकुल योजनेत १५ कोटीचा घोटाळा ; घरकुल योजनेचा ठेकेदार भाजपाचाच जबाबदार पदाधिकारी
नगरसेवक बुवा तारी यांचा गंभीर आरोप
देवगड जामसंडे न.पं.हद्दीतील पंतप्रधान घरकुल आवास योजनेचा ठेकेदार भाजपाचेच माजी तालुकाध्यक्ष संदीप साटम असून २५ कोटीची ही योजना होती मात्र कामाचा पत्ता नाही उलट या योजनेद्वारे १५ कोटीचा घोटाळा करून न.पं.ची फसवणुक करण्यात आली असा गंभीर आरोप नगरसेवक निवृत्ती उर्फ बुवा तारी यांनी केला.या योजनेतील लाभार्थीही भाजपाचेच माजी नगरसेवक व पदाधिकारी असल्याचा गौप्यस्फोटही तारी यांनी केला.माजी नगराध्यक्ष योगेश चांदोस्कर यांना राजकारणातून संन्यास घ्यायची गरजच नाही कारण देवगडमधील जनतेनेच त्यांनी घरी बसविले आहे अशी टीका केली तर शिवसेना तालुकाप्रमुख विलास साळसकर याची गत ही ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी अशी आहे असा टोलाही तारी यांनी लगावला.
देवगड येथील उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेना संपर्क कार्यालयात आयोजित पत्रकारपरिषदेत बुवा तारी यांनी भाजपा, माजी नगराध्यक्ष योगेश चांदोस्कर आणि शिवसेना तालुकाप्रमुख विलास साळसकर यांच्यावर जोरदार निशाना साधला.देवगड न.पं.हद्दीतील २५ कोटीच्या घरकुल योजनेचे काम सुरू करण्यात आले मात्र प्रत्यक्षात कोणतेही काम झाले नाही.हे कामाचा ठेका भाजपाचाच एका जबाबदार पदाधिकाèयाचा कंपनीकडे आहे.या घरकुल योजनेच्या लाभाथ्र्यांकडून स्केवर फुट दरामागे जादा रक्कम घेवून सुमारे १५ कोटीचा घोटाळा करून न.पं.ची फसवणुक केली आहे असा गंभीर आरोप तारी यांनी केला.
तारी यांनी यावेळी विलास साळसकर यांच्या आरोपांची समाचार घेतला.मी राणे समर्थक नाही मी उध्दव ठाकरे यांच्याशी गद्दारी केली नाही.पक्षाशी प्रामाणिक आहे याउलट साळसकर यांची स्थिती ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी अशी आहे.आमच्या पक्षात प्रवेश द्या यासाठी ते माजी खासदार विनायक राऊत यांना दिल्लीला भेटण्यास गेले होते परंतू त्यांचा प्रवेशाला स्थानिक कार्यकत्र्यांनी विरोध केला यामुळे साळसकर हे कोणाचेच नाही.मी राजकारण सोडेन परंतू पक्ष सोडणार नाही असे तारी यांनी सांगीतले.
माजी नगराध्यक्ष योगेश चांदोस्कर हे कागदावर हुशार आहेत.कचरा डंपींगसाठी घेतलेल्या जागांमध्ये कितीवेळा राजकारण करून अडथळे आणण्याचा खटाटोप केला हे सर्वांना ज्ञात आहे.त्यांनी मला राजकारणातुन संन्यास घेण्याचा सल्ला देवू नये त्यांना देवगडमधील जनतेने नाकारले म्हणून घरी बसण्याची वेळ आली अशी टीका तारी यांनी केली.प्रभाग मधील ११ मधील शौचालय हे कागदावरच फाईव्ह स्टार दाखविले.चांदोस्कर यांची हुशारी वैयक्तिक फायद्यासाठी आणि स्वत:चा आर्थिक फायद्यासाठी दाखविली आहे असा आरोप तारी यांनी केला.पत्रकारपरिषदेला माजी नगरसेवक विकास कोयंडे, युवा सेना उपजिल्हाप्रमुख निनाद देशपांडे आणि धनंजय जोशी उपस्थित होते.