आम. वैभव नाईक यांच्या सारख्या सुसंस्कृत उमेदवाराला‌ संधी द्यावी – परशुराम उपरकर 

कणकवली 16 नोव्हेंबर (प्रतिनिधी)

आम. वैभव नाईक यांच्या सारख्या सुसंस्कृत उमेदवाराला‌ संधी द्यावी – परशुराम उपरकर 

कुडाळ मालवण विधानसभा मतदार संघातील मतदारांनी आम. वैभव नाईक यांच्या सारख्या सुसंस्कृत उमेदवाराला संधी द्यावी. जो उमेदवार सकाळी 11 वाजता उठत असेल तो तुमचा विकास काय करणार हे समजून घ्या असा टोला माजी आमदार परशुराम उपरकर यांनी लगावला आहे
कणकवली येथील विजय भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना माजी आमदार परशुराम उपरकर म्हणाले ,कुडाळ मालवणचे महायुतीची उमेदवारांची सकाळ अकरा वाजता होत असल्याची चर्चा आहे. त्यामूळे जे कार्यकर्ते सकाळीच उठून प्रचार करतात अशा कार्यकर्त्यांमध्ये गैरसमज निर्माण झाला आहे .

 

लोकप्रतिनिधी म्हणून हे उमेदवार योग्य आहेत काय हे मतदारांनी समजून घ्यावे. चिपळूण येथे आम.भास्कर जाधव यांच्या विषयी जी भाषा वापरली ती असंसदीय भाषा होती. त्या सभेमध्ये तरुणी महिला मोठ्या संख्येने उपस्थित असताना त्यांनी जी अर्वाच्य भाषा वापरली ती अशोभनीय आहे म्हणजेच वैभव नाईक यांच्या विरोधातील महायुतीचे उमेदवार हे सुसंस्कृत नाही हे स्पष्ट होते.असे सांगत श्री.उपरकर यांनी चिपळूणच्या त्या भाषणाचा व्हिडिओ ही माध्यमांसमोर सादर केला.

 

श्री . उपरकर म्हणाले,मुळात निवडणूक जाहीर होईपर्यंत हे भाजप पक्षात होते आणि उमेदवारीसाठी शिवसेनेचा चोरलेला धनुष्यबाण मिळवण्यासाठी ज्यांनी भाजप सोडून शिंदे गटांमध्ये प्रवेश करून उमेदवारी मिळवली ते केवळ उमेदवारीसाठीच या मतदारसंघात लढत आहेत हे मतदारांनी जाणून घ्यावे. तुमचा विकास करण्यासाठी ते या मतदारसंघात आलेले नाहीत,त्यांना फक्त उमेदवारी हवी होती. आता भाजपमधील काही कार्यकर्ते ते शिवसेना शिंदे गटामध्ये प्रवेश करून घेत आहे. याचा अर्थ पूर्वी ज्या भाजप पक्षात होते तो भाजप पक्ष संपवण्याचे काम निलेश राणे हे कुडाळ मालवण मतदारसंघांमध्ये करत आहे.

 

आम.वैभव नाईक निश्चितपणे 25000 चे मताधिक्य घेऊन विजयी होतील असा दावाही परशूराम उपरकर यांनी केला आहे.

 

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *