कणकवली, दि. १६ नोव्हेंबर (प्रतिनिधी)
देवगडात महाविकास आघाडीचे उमेदवार संदेश पारकर यांच्या प्रचारार्थ शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांची तोफ धडाडणार – संदेश पारकर
कणकवली विधानसभा मतदार संघाचे महाविकास आघाडीचे ठाकरे शिवसेनेचे उमेदवार संदेश पारकर यांच्या प्रचारार्थ कणकवली-देवगड-वैभववाडी या तिन्ही ठिकाणी शिवसेना नेत्यांचा धडाका लागला आहे. कणकवलीत उद्धव ठाकरे, वैभववाडीत शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांच्या सभेनंतर १७ नोव्हेंबरला सायंकाळी ४ वाजता देवगड कॉलेज नाका येथे शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांची जाहीर सभा होणार आहे. आदित्य ठाकरे काय बोलणार? याकडे सर्वांचे लक्ष लागुन राहीले आहे.

