देवगड (स्वप्नील लोके)
ग्रेट .. सुधांशू ! पुन्हा एकदा ,गोल्डन बॉय सुधांशूचं ….
श्री. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला या ठिकाणी संपन्न झालेल्या ‘इंद्रधनुष्य’ या राज्यस्तरीय आंतरविद्यापीठीय युवा महोत्सवात आपल्या श्री. स. ह. केळकर महाविद्यालयाच्या विद्यार्थी कु. सुधांशू समीर सोमण याने संगीत या कलाप्रकारात
1.भारतीय समूह गायन सुवर्णपदक
2.पाश्चिमात्य समूह गायन – सुवर्णपदक
3.फोक ऑर्केस्ट्रा- कांस्यपदक
4. शास्त्रीय संगीत – कांस्यपदक
5. नाट्यसंगीत- कांस्यपदक
अशी एकूण पाच पदके मिळवून उत्तुंग यश संपादित करत पुन्हा एकदा ह्या वर्षी देखील “गोल्डन बॉय” हा मानाचा किताब मिळवून देवगड महाविद्यालयाच्या शिरपेचात अजून एक मानाचा तुरा रोवला आहे.
त्याच्या या यशाबद्दल त्याचे तसेच त्याला लाभलेले मार्गदर्शक शिक्षक, दिग्दर्शक यांचे शिक्षण विकास मंडळाचे पदाधिकारी तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य, उपप्राचार्य, प्राध्यापक वृंद आणि प्रशासकीय कर्मचारी यांनी अभिनंदन करून राष्ट्रीय स्तरावर होणार्या पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
