हिंदळे ग्रामसेविकेची बदली करा ग्रामस्थांचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन ; हिंदळे ग्रामपंचायतमध्ये सदर ग्रामसेवक प्रवेश बंदी ; ग्रामपंचायतचे बीडीओंना पत्र

0 minutes, 0 seconds Read

 

देवगड (प्रतिनिधी) ३१ ऑगस्ट २०२४

 

हिंदळे ग्रामसेविकेची बदली करा ग्रामस्थांचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन ; हिंदळे ग्रामपंचायतमध्ये सदर ग्रामसेवक प्रवेश बंदी ; ग्रामपंचायतचे बीडीओंना पत्र

हिंदळे ग्रामपंचायत मध्ये ग्रामसेवकांना प्रवेश बंदी करत आहोत अशा आशयाचे पत्र स्वतः हिंदळे ग्रामपंचायतीने देवगड पंचायत समिती गटविकास अधिकारी यांना पाठवून दिले आहे. तर सदर ग्रामसेविकेस सहा वर्षे झाली. मात्र पाच वर्षांनी प्रशासकीय बदली होत असताना सुद्धा अजूनही त्याची बदली झालेली नाही. तसेच त्या कार्यालयीन वेळेत उपस्थित राहत नाहीत. अशा सदर ग्रामसेविकेच्या पाच वर्षातील कालावधीतील कार्याच्या पाढाच उपमुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत विभाग ओरस यांच्यासमोर वाचत यांना देखील या संदर्भात हिंदळे ग्रामस्थांनी दिले आहे.
या निवेदनात म्हटले आहे की, २९ ऑगस्ट २०२४ च्या झालेल्या ग्रामसभेत बहुसंख्येने महिला उपस्थित होत्या. या सभेत बांधकाम कामगारांना सरकारी योजनेमधून साहित्य व अनुदान मिळत असलेल्या फॉर्मवर ग्रामसेविका सही देत नसल्याने ग्रामस्थांनी दिनांक ३० ऑगस्ट रोजी सदर ग्रामसेविकेस हिंदळे ग्रामपंचायत मध्ये प्रवेश करायला देणार नाही. अशा प्रकारचा निर्णय घेतला आहे. सदर ठिकाणी आपण स्वतः उपस्थित राहून ग्रामस्थांच्या तक्रारीचे निवारण करावे या ठिकाणी उद्या जर काही अनुचित प्रकार घडला तर ग्रामपंचायत हिंदळे जबाबदार राहणार नाही याची सर्वस्वी जबाबदारी आपणावर राहील याची नोंद घ्यावी.असेही यापत्रात नमूद केले आहे.

यासंदर्भात हिंदळे ग्रामस्थांनी उपमुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत विभाग ओरस यांनाही याबाबत पत्र दिले आहे.यावेळी हिंदळे ग्रामस्थ निखिल तारी,अक्षय राणे,उदय हिंदळेकर, प्रवीण राणे,अनुजा जाधव, अक्षता राणे, उर्मिला प्रभू ,जयवंत प्रभू ,सुवर्णा हिंदळेकर ,आदींसह हिंदळे ग्रामस्थ उपस्थित होते.

 

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *