विवाहितेवर अत्याचार केल्याप्रकरणी संशयित आरोपीसं जिल्हा सत्र न्यायालयाने केला जामीन मंजूर

0 minutes, 0 seconds Read

विवाहितेवर अत्याचार केल्याप्रकरणी संशयित आरोपीसं जिल्हा सत्र न्यायालयाने केला जामीन मंजूर

देवगड (प्रतिनिधी) १८ ऑगस्ट २०२४

तालुक्यातील एका विवाहितेवर अत्याचार केल्याप्रकरणी संशयित आरोपीस ओरोस येथील जिल्हा व सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. संशयिताच्यावतीने अँड अविनाश माणगांवकर, अँड. सिद्धेश माणगांवकर व अँड. श्रुती माणगांवकर यांनी यशस्वी युक्तिवाद केला.

फेसबुकवरून झालेल्या मैत्रीचा गैरफायदा घेत संशयित आरोपी याने एका विवाहितेवर अत्याचार करून तिला जीवे मारण्याची धमकी दिली होती. याबाबतची फिर्याद पीडित विवाहितेने २४ जून २०२४ रोजी पोलीस स्थानकात दाखल केली होती. या फिर्यादीनुसार संशयित आरोपी विरुद्ध भा. दं. वि. कलम ३७६, ३५४, ३५४ (अ) (१), (इ) आणि ५०६ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *