श्री देवी सोनुर्ली माऊलीचा वार्षिक जत्रौत्सवास राज्यभरातील भाविकांची गर्दी

 

सावंतवाडी (मंगल कामत)

श्री देवी सोनुर्ली माऊलीचा वार्षिक जत्रौत्सवास राज्यभरातील भाविकांची गर्दी

         दक्षिण कोकणचे प्रति पंढरपुर म्हणून प्रसिद्ध असलेल्या श्री देवी सोनुर्ली माऊलीचा वार्षिक जत्रौत्सवास प्रारंभ झाला आहे. लोटांगणाची जत्रा म्हणून प्रसिद्ध असलेल्या देवी माऊलीच्या जत्रौत्सवासाठी महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक व इतर राज्यातूनही भाविकांनी पहाटेपासूनच सोनुर्लीत गर्दी केली आहे.

                जत्रौत्सवानिमित्त दर्शनासाठी व ओटी भरण्यासाठी पहाटेपासूनच हजारोंच्या संख्येने भविकांच्या रांगा लागल्या आहेत. पोलिस प्रशासनाबरोबरच देवस्थान कमिटी व स्थानिक भक्त मंडळाने चोख नियोजन केले असल्यामुळे भाविकांना सुलभपणे दर्शन घेता येत आहे. रात्री उशिरा लोटांगण सोहळा संपन्न होणार आहे. पुरुष व महिला आपले नवस फेडणार आहेत. उद्या तुळाभारानंतर उत्सवाची सांगता होणार आहे.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *