कोलकात्ता येथील मृत पीडितेला श्रद्धांजली वाहण्यासाठी देवगडवासिय एकटवले ; शेकडो मेणबत्ती झाल्या प्रज्वलित
कोलकात्ता येथील घडलेल्या घृणास्पद घटनेचा केला निषेध
कोलकात्ता येथील घडलेल्या घृणास्पद घटनेचा निषेध नोंदविण्यासाठी येथील शेठ म. ग. हायस्कूलच्या समोरील पटांगणावर मंगळवारी सायंकाळी देवगडवासियांनी बहुसंख्येने हजेरी लावली. या घटनेतील मृत पीडितेला श्रद्धांजली वाहण्यासाठी शेकडो मेणबत्ती प्रज्वलित झाल्या होत्या.
यावेळी आमदार नीतेश राणे, माजी आमदार अँड. अजित गोगटे, जिल्हा बँकेचे माजी संचालक अँड अविनाश माणगावकर, डॉ. सुनील आठवले यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर, लोकप्रतिनिधी, व्यापारी, प्रतिष्ठित नागरिक, नगरसेवक यांच्यासह विविध सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी, स्थानिक ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते. कोलकात्ता येथील पीडितेवर झालेल्या अन्यायाच्या वेदनेचा हुंकार येथील कु. चैत्राली पोकळे हिने शब्दसुमनांनी मांडला. प्रास्ताविक अँड सिद्धेश माणगावकर,ऋत्विक धुरी यांनी केले.