देवगड जामसंडे नगरपंचायतीचे प्रशासनाचे नियुक्त पथक कागदावर मोकाट गुरे रस्त्यावर ;

देवगड जामसंडे नगरपंचायतीचे प्रशासनाचे नियुक्त पथक कागदावर मोकाट गुरे रस्त्यावर 

देवगड : प्रतिनिधी

देवगड जामसंडे शहरात मोकाट गुरांचा प्रश्न हा मोठी समस्या बनली आहे ही मोकाट गुरे रस्त्यावर बसून असल्याने रात्रीच्या वेळी मोठे अपघात होतात दिवसाही गुरे अशीच रस्त्यावर बसून असतात त्यामुळे वाहताना अडथळा निर्माण होतो मात्र नगरपंचायत प्रशासनाकडून यावर कोणतीही ठोस उपाययोजना केली जात नाही. यासाठी पथक नियुक्त करण्यात आले मात्र हे नियुक्त पथक फक्त कागदावरच आहे प्रत्यक्षात कृती शून्य दिसतेय. त्यामुळे दर महिन्याच्या नगरपंचायतीच्या मासिक सभेत मोकाट गुरांचा प्रश्न हा प्रमुख मुद्दा सतत वादाचा ठरतोय.

नगरोत्यथानच्या कामांच्या प्रस्तावांना मंजुरी व जिल्हा वार्षिक योजना अंतर्गत कामांच्या आराखड्यावरून सत्ताधारी व विरोधकांमध्ये जोरदार झालेल्या खडाजंगीवरून न.पं.ची सर्वसाधारण सभा गाजली. नगरसेवकांच्या तक्रारीची दखल न घेता तक्रार केलेल्या ठेकेदारांवर कारवाई नाहीच उलट बील पुर्ण अदा करून त्याला प्रशासनाने अभय दिले असा आरोप करीत नगरसेवक बुवा तारी यांनी मुख्याधिकारी व न.पं.प्रशासनावर तीव्र नाराजी व्यक्त केली.

देवगड जामसंडे न.पं.ची मासिक सर्वसाधारण सभा गुरूवारी नगराध्यक्षा साक्षी प्रभू यांच्या अध्यक्षतेखाली न.पं.सभागृहात पार पडली.सभेला उपनगराध्यक्षा सौ.मिताली सावंत, मुख्याधिकारी सुरज कांबळे उपस्थित होते. मोकाट गुरांचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनत असून त्याबाबत कोणतीही कारवाई झाली नाही. मोकाट गुरांचा प्रश्नावरून नगरसेवक नितीन बांदेकर, सौ.आद्या गुमास्ते, शरद ठुकरूल आदी नगरसेवकांनी प्रशासनाला धारेवर धरले.बांदेकर यांनी मोकाट गुरांसाठी टेंबवली येथे घेतलेल्या जागेत कोंडवाडा का बांधू शकत नाही असा प्रश्न उपस्थित केला.यावेळी प्रशासनाकडून मोकाट गुरांसाठी पथक नेमलेले आहे अशी माहिती देण्यात आली यावेळी नितीन बांदेकर यांनी त्या पथकाबाबत नगरसेवकांना कोणतीही माहिती का दिली नाही असा प्रश्न केला.

न.पं.ची घंटागाडी नियमित जात नाही.नागरिकांचा कचरा उचलला जात नसेल कचरा करही रद्द करा असे खडे बोल सभेत नगरसेवकांनी प्रशासनाला सुनावले.गणेशोत्सव नियोजन सभेत मुख्याधिकारी उपस्थित नव्हते मात्र त्यानंतरच नियोजनामध्येही ते कुठेही दिसले नाहीत.मुलभूत प्रश्न व विकासकामांबाबत मुख्याधिकारी म्हणून तुम्ही भुमिका स्पष्ट करा असे नगरसेविका सौ.तन्वी चांदोस्कर यांनी सांगीतले.यावेळी मुख्याधिकारी सुरज कांबळे यांनी घनकचरा व्यवस्थापनाबाबत आपण करीत असलेल्या प्रयत्नांची माहिती दिली.प्रयत्न करूनही जागेसाठी वैयक्तिक स्तरावर जावुनही जागा उपलब्ध होत नाही अशी खंत त्यांनी व्यक्त केली.

नगरोत्थानमधुन मंजुर झालेल्या विकासकामांच्या प्रस्तावांना मंजुरी द्यावी हा विषय सभागृहात पटलावर आला यावेळी नगरसेवक नितीन बांदेकर यांनी नगरोत्थामधील विकासकामांमध्ये प्रभाग २,४ व १२ या प्रभागातील एकाही विकासकामाचा समावेश नाही.नगरोत्थानची कामे शासनाकडून मंजुर झालेली असतील तर तीन प्रभागांवरच विकासकामांबाबत अन्याय का असा प्रश्न उपस्थित करून नाराजी व निषेध व्यक्त केला.त्यानंतर सभागृहात विषयपत्रिकेवरील जिल्हा वार्षिक योजना अंतर्गत कामे आराखड्यात समाविष्ट करणे या विषयावर चर्चा झाली यावेळी आराखडयात समाविष्ट असलेल्या कामांचे वाचन करण्यात आले यामध्ये पाणीप्रश्नाचे महत्वाचे काम वगळता भाजपा नगरसेवकाच्या एकाही प्रभागातील कामाचा समावेश का नाही?असा पक्षपातीपणा का असा सवाल भाजपा नगरसेविका प्रणाली माने, तन्वी चांदोस्कर, शरद ठुकरूल, व्ही.सी.खडपकर आदी नगरसेवकांनी सत्ताधारी नगरसेवकांना विचारला.सर्व प्रभागातील कामांचा समावेश करावा अशी मागणी भाजपा नगरसेवकांनी लावून धरली.आराखडयाला मंजुरी देवू परंतू भाजपा नगरसेवकांच्या प्रभागातील कामेही समाविष्ट करा अन्यथा मतदान घ्या अशी सुचना नगरसेविका सौ.माने यांनी केली.यावेळी सत्ताधारी नगरसेवक बुवा तारी, नितीन बांदेकर, तेजस मामघाडी यांनीही मतदान घ्याच असे सांगीतले.यामुळे सत्ताधारी व विरोधी नगरसेवकांमध्ये जोरदार खडाजंगी झाली.खडाजंगीनंतर आराखड्याला मंजुरी देण्यात आली.

नगरसेवक बुवा तारी यांनी हॉटमिक्स व कोल्डमिक्स रस्त्यांबाबत केलेली तक्रार व १५ ऑगस्ट रोजी उपोषणाला बसण्याचे दिलेले पत्र याबाबत प्रशासनाकडून कार्यवाही करून अहवाल देतो असे आश्वासन देण्यात आले होते.मात्र त्याबाबत कोणतीही दखल घेतली गेली नाही उलट संबंधित ठेकेदाराचे बील अदा करून नये अशी मागणी करूनही त्याच्यावर मागणी करूनही कारवाई न करता बील अदा करून त्याला अभय देण्यात आले व आपण केलेली तक्रार बेदखल करण्यात आली.प्रशासनाचा असा मनमानी कारभार असेल तर पुन्हा उपोषणाला बसणार असल्याचा इशारा बुवा तारी यांनी दिला.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *