कोलकत्ता व बदलापूर घटनेच्या पार्श्वभूमीवर विविध संघटनांनी देवगड तहसीलदार व पोलिसात दिली निवेदने

0 minutes, 2 seconds Read

 

देवगड (प्रतिनिधी)दि. २२ऑगस्ट २०२४

 

कोलकत्ता व बदलापूर घटनेच्या पार्श्वभूमीवर विविध संघटनांनी देवगड तहसीलदार व पोलिसात दिली निवेदने

 

 

महिला सुरक्षा योजना राबवावी निवेदनाद्वारे केली मागणी

 

 

देवगड तालुका उबाठा पक्षाचे पदाधिकारी आणि देवगड जामसंडे शहर बंधू आणि महिला भगिनी…           तसेच देवगड जामसंडे शहर विकास संघटना पदाधिकारी आणि हुमन राईटचे सर्व पदाधिकारी यांनी काल कोलकत्ता आणि बदलापूर येथे झालेल्या अत्याचाराच्या पाश्र्वभूमीवर गुरुवार 22 ऑगस्ट 2024 रोजी देवगड तहसीलदार तसेच पोलीस निरीक्षक देवगड यांची भेट घेत निवेदन सादर केले.
या निवेदनात या म्हटले आहे की,कोलकत्ता येथे एका स्त्री डॉक्टर व बदलापूर येथे एका शाळेतील दोन चिमुकल्या अल्पवयीन लहान मुलींवर लैंगिक अत्याचाराचा घृणास्पद प्रकार घडलेला आहे. सदर प्रकारामुळे संपूर्ण महाराष्ट्र नव्हे तर देशांमध्ये तीव्र पडसाद उमटले असून महाराष्ट्र तसेच देशातील विविध गावांमध्ये लहान मुलामुलींच्या सुरक्षेबाबत गंभीर चिंता निर्माण होऊ लागली आहे.आपल्या देवगड तालुक्याचा विचार करता आपल्या तालुक्यात जवळपास प्रत्येक मोठ्या गावामध्ये खाजगी सरकारी लहान मोठ्या शाळा आहेत सदर हादरवणाऱ्या घटनेच्या पार्श्वभूमीवर आपल्या तालुक्यातील शाळांचा लहान मुलांचे सुरक्षितच्या दृष्टीने योग्य तो आढावा देखरेख सूचना देणे ही तातडीची गरज निर्माण झालेली आहे. सदर निंदनास्पद घटनेनंतर महाराष्ट्र शासनाने सर्व शाळांमध्ये विविध नियम सूचना जारी केल्या असून त्याबाबतची माहिती आपणास शासनामार्फत येईल. मात्र आम्ही एक संघटना म्हणून आपणास या निवेदनाद्वारे काही उपाययोजना सुचवू इच्छितो त्याबाबत आपण गंभीरपणे व तातडीने अंमलबजावणी करायला अशी आम्हाला आशा आहे.

देवगड तालुक्यातील विविध शाळांना भेटी देणे शाळांमधील विद्यार्थ्यांची संख्या कर्मचारी वर्ग मुलांची ने आण करणारी वाहने त्यांचे कर्मचारी वाहक चालक यांच्या नोंदी याबाबत परीक्षण देखरेख ठेवणे. मुलांची ने आन करणारी वाहने यांची कायदेशीर कागदपत्रे परमिट ओळखपत्रे यांची तपासणी त्याबाबत दैनंदिन रजिस्टर ठेवणे बाबत सूचना करणे. शाळांमध्ये शासनाच्या नवीन अटीप्रमाणे शासन निर्णयाच्या तारखेपासून एक महिन्याच्या आत शाळा व परिसरात सीसीटीव्ही बसविणे बंधनकारक आहे. या तरतुदीचे पालन नाही केले तर संबंधित शाळेचे अनुदान रोखणे मान्यता रद्द केली जाईल असे स्पष्ट नमूद केले आहे. त्यामुळे संबंधित शाळांमध्ये सदर अटीचे पालन झाले किंवा नाही याबाबत पाहणे देखरेख करणे. सखी सावित्री समिती स्थापन केली आहे का. याबाबत पाहणी करणे शाळा कॉलेजचे परिसरात रस्त्यावर फिरणाऱ्या रोडरोमीवर कारवाई करणे . शाळा कॉलेजेस सुरू असताना त्या ठिकाणी सुरक्षेतेसाठी तातडीने पोलीस तैनात करणे. देवगड शहरातील सीसीटीव्ही कॅमेरा चालू स्थितीत आहेत का याबाबत खात्री करणे. महिला व मुलांचे सुरक्षितेसाठी आपले पोलीस स्टेशनला स्वतंत्र कक्ष सुरू करणे. या उपाययोजना आपणास आम्ही कळविले असून त्याबाबत योग्य ती अंमलबजावणी आपण करावी अशी आमची विनंती आहे. जेणेकरून देवगड तालुका देवगड शहर व शाळांमध्ये भयमुक्त वातावरण तयार होईल. असे या निवेदनात नमूद केले आहे.

 

यावेळी उबाठा सेना महिला संघटक सौ हर्षा ठाकूर ,सौ शामल जोशी, विमल बलवान, जान्हवी नाथगोसावी, मधुरा तारी, सौ प्राची कोळबंकर, श्रुती करंदीकर, स्वाती बापट, विना इंदोलीकर, रेखा तावडे, शिवांगी भिडे,अरुणा पेठे,अनुजा जोशी, दीक्षा तेली, दयानंद तेली, शाम कदम, विलास रूमडे, संतोष पांचाळ, बाळा कनेरकर, आदी उपस्थित होते.

 

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *