महानगरपालिका निवडणुकीत भाजपा महायुतीचा दणदणीत विजय ; देवगड–जामसंडे येथे फटाके फोडून आनंदोत्सव

0 minutes, 0 seconds Read

 

देवगड (प्रतिनिधी)

 

महाराष्ट्र राज्यामध्ये झालेल्या महानगरपालिका निवडणुकीत भारतीय जनता पार्टी महायुतीने दणदणीत विजय संपादन केला आहे. विशेषतः मुंबई महानगरपालिकेमध्ये भाजपा व मित्रपक्षांना मिळालेल्या घवघवीत यशाच्या पार्श्वभूमीवर भाजपा देवगड तालुक्याच्या वतीने जामसंडे येथील भाजपा कार्यालयासमोर फटाके फोडून आनंदोत्सव साजरा करण्यात आला.

या आनंदोत्सवप्रसंगी भाजपा उपाध्यक्ष प्रियांका साळसकर, जिल्हा सचिव प्रकाश गोगटे, शहराध्यक्ष वैभव करंगुटकर, तालुका कार्यकारिणी सदस्य महेश ताम्हणकर, महिला मोर्चा तालुकाध्यक्ष उषःकला केळुस्कर, शक्तीकेंद्र प्रमुख गणपत गावकर, सुभाष धुरी, महिला पदाधिकारी मनस्वी घारे, पाणीपुरवठा समिती सभापती तन्वी चांदोस्कर, स्वच्छता सभापती नगरसेवक बुवा तारी, नगरसेविका आद्या गुमास्ते, माजी नगरसेवक बापू जुवाटकर, व्हि. सी. खडपकर, माजी शहराध्यक्ष योगेश पाटकर, संजय बांदेकर, आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *