उद्या , तब्बल तेरा वर्षांनी ! ग्रामदैवत श्री दिर्बादेवी रामेश्वर देवस्वारी देवगड किल्ला येथे श्री गणेशाच्या भेटीला
ग्रामदैवत श्री दिर्बादेवी रामेश्वर देवस्वारी २० फेब्रुवारी रोजी देवगड किल्ला येथ श्री गणेशाच्या भेटीसाठी जाणार आहेत. देवगड जामसंडे सह बारा वाड्यांचे ग्रामदैवत श्री दिर्बादेवी रामेश्वर देव स्वारी दि.२० फेब्रुवारी रोजी देवगड किल्ला येथील श्री देव गणेशाच्या भेटीसाठी येणार आहे देवगड येथे तब्बल १३ वर्षांनी या देवस्वारीचे आगमन रयतेसह होणार असल्याने देवगड जामसंडे व येथील ग्रामस्थ. भक्तगण या देवस्वारीच्या स्वागतासाठ सज्ज झाले असून पारंपरिक पायवाटा, ठिकठिकाणी स्वछता मोहीम राबविण्यात येत आहे.तसेच आकर्षक रोषणाई रांगोळ्या सजावट स्वागत फलक उभारण्यात येणार आहे .
तब्बल १३ वर्षांनी देवगड किल्ला येथील श्री गणेशाच्या भेटीसाठी श्री दिर्बादेवी रामेश्वर दि. २० फेब्रुवारी स.७ वाजता जामसंडे येथून ढोल ताशांच्या गजरात निघणार आहे. दुपारी १ वाजेपर्यंत ही देव स्वारी देवगड किल्ला येथे गणेश मंदिरात पोहोचेल त्यानंतर तेथे महाप्रसाद विश्रांती घेऊन पुन्हा देवगड किल्ला गणपती मंदिर मुख्य बाजारपेठ एसटी स्टँड मार्ग येथून जामसंडे कडे रवाना होईल