ज्या प्रभागात त्यांना पराभवाची भिती वाटते त्या प्रभागात खोटे आरोप करायचे हि त्यांची पूर्वी पासूनची जूनी सवय आहेमतदान केंद्रावर गैरप्रकार असतील तर पारकर यांनी निवडणूक यंत्रणेकडे तक्रार करावी
कणकवली (प्रतिनिधी)संदेश पारकरांचे आयुष्य दहशतीखाली गेले आहे. त्यामुळे त्यांना तेच दिसणार. भाजपला जास्त मतदान होईल अशी भीती पारकरांना वाटते त्या बुथवर पारकर घाबरतात आणि त्यांना त्या बुथवर दहशतवाद दिसतो. अन्यथा दहशतवाद दिसत नाही त्यांना सरळ सरळ आपला पराभव दिसत असल्याने दहशतवाद हा विषय त्यांनी काढला आहे. कणकवलीतील जनता सुज्ञ असून कमळ निशाणीला मतदान होईल आणि त्यामुळे पारकर बिथरले आहे.असा पलटवार भाजपचे कणकवलीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार समीर नलावडे यांनी केला.
पारकर यांनी तीन नंबर केंद्रावर भाजपचे कार्यकर्ते जाहीर प्रचार संपल्यानंतर प्रचार करत असल्याचा आरोप केला होता.तसेच मतदारांना कन्फ्युज करतात असे सांगतानाच भाजपची निशाणी आणि डेमो मशिन मतदारांना दाखवत असल्याचा आरोप करीत गैरप्रकार सुरु असल्याचा आरोप केला होता.या आरोपांना समीर नलावडे यांनी प्रत्युत्तर दिले.
यावेळी नलावडे म्हणाले की, पारकर यांना सरळ सरळ आपला पराभव दिसत असल्याने ते बिथरले आहेत.ज्या प्रभागात त्यांना भिती वाटते त्या प्रभागात खोटे आरोप करायचे हि त्यांची पूर्वी पासूनची जूनी सवय आहे.
प्रचार बंद असताना नलावडे शर्टावर पक्षाचे चिन्ह लावुन फिरत आहेत असा आरोप पारकर यांनी केला आहे.असे नलावडे यांना विचारताच नलावडे म्हणाले की,माझा ते प्रचार करताहेत मी त्यांचा आभारी आहे.मतदान केंद्रावर गैरप्रकार असतील तर त्यांनी निवडणूक यंत्रणेकडे तक्रार करावी.कणकवलीची जनता विकासाच्या बाजूने मतदान करतील असा विश्वास समीर नलावडे यांनी व्यक्त केला.कणकवलीची सत्ता पुन्हा जनता भाजपच्याच हाती देतील.असेही ते म्हणाले.
