कणकवलीत शांत सुरळीत मतदान : सुनियोजित निवडणूक प्रक्रियेस जिल्हाधिकाऱ्यांकडून ‘गुड जॉब’ची प्रशंसा

0 minutes, 0 seconds Read

 

कणकवली (प्रतिनिधी) कणकवली नगरपंचायत निवडणुकीत मतदान प्रक्रिया शांततेत आणि सुरळीत वातावरणात पार पडल्याचे समाधान जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी व्यक्त केले. मंगळवारी सायंकाळी त्यांनी कणकवली तहसीलदार कार्यालयाला भेट देत संपूर्ण मतदान प्रक्रियेचा आढावा घेतला.

तहसीलदार तथा निवडणूक निर्णय अधिकारी दीक्षांत देशपांडे यांनी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी गौरी पाटील
आणि सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने अत्यंत सुनियोजित पद्धतीने निवडणूक प्रक्रिया राबवली. सुयोग्य नियोजन, वेळेवर समन्वय आणि शिस्तबद्ध कामकाज यामुळे कोणत्याही अडथळ्यांशिवाय मतदान यशस्वीरीत्या पार पडल्याचे त्यांनी सांगितले.

या प्रभावी कार्यप्रणालीबद्दल जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी तहसीलदार तथा निवडणूक निर्णय अधिकारी दीक्षांत देशपांडे यांचे “गुड जॉब” असे कौतुक करून विशेष प्रशंसा केली.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *