oplus_4194304

प्रचार संपला तरीही विरोधकांकडू मतदान केंद्रावर जाऊन मतदारांना कन्व्हेज करण्याचा प्रकार सुरु – संदेश पारकरांचा नलावडेंवर आरोप 

0 minutes, 0 seconds Read

मतदान केंद्रावरील गैरप्रकारावर निवडणूक यंत्रणेने आळा घालावा ; निवडणूक यंत्रणेला माहीती दिल्याचे पारकर यांनी सांगितले 

कणकवली (प्रतिनिधी)

मतदान केंद्रावर रेषा आखून दिलेली आहे.त्या रेषेच्या आत मध्ये जाऊन मतदारांना कन्व्हेज करण्याचा प्रयत्न विरोधी पक्षाचे कार्यकर्ते आणि भाजपचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार करत आहेत.तसेच जे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत ते आपल्या शर्टावर पक्षाचे चिन्ह लावुन मतदान केंद्रावर फिरतात आणि मतदारांना कन्व्हेज करण्याचा प्रयत्न करतात.असा आरोप शहर विकास आघाडीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार संदेश पारकर यांनी समीर नलावडे आणि भाजपच्या कार्यकर्त्यांवर केला.ते‌ कणकवली येथील तीन नंबर च्या मतदान केंद्रावर बोलत होते.

यावेळी पुढे बोलताना पारकर म्हणाले की, काल रात्री निवडणूक प्रचार संपला आहे तरीही विरोधी पक्षाचे कार्यकर्ते आजही मतदान केंद्रावर मशीन घेऊन मतदारांना कन्व्हेज करण्याचा प्रयत्न करत आहेत. मुंबईमधील कार्यकर्ते टेबलावर जाऊन दहशत निर्माण करीत आहेत.

असा आरोप करताना पारकर म्हणाले की, या सगळ्या गोष्टी थांबल्या पाहिजेत.यासाठी तहसीलदार आणि निवडणूक यंत्रणेनेकडे बोललो आहे.विरोधी पक्षाकडून चाललेले गैरप्रकार थांबले पाहिजेत.यावर निवडणूक यंत्रणेने निर्णय करावा.असेही संदेश पारकर यांनी सांगितले.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *