देवगड (प्रतिनिधी)
बहुजन हिताय बौद्ध मंडळ कदमवाडी तिवरे यांना महाधम्मरक्खिता पुरस्कार प्रदान
जय भीम उत्कर्ष मंडळ किनळे व ल.रा. जाधव गुरुजी परिवार यांच्या वतीने देण्यात येणारा ल.रा. जाधव गुरुजी स्मृती महाधम्मरक्खिता पुरस्कार या वर्षी बहुजन हिताय बौद्ध मंडळ कदमवाडी तिवरे या मंडळास प्रदान करण्यात आला.मंडळाने केलेल्या सामाजिक शैक्षणिक आर्थिक वैचारिक कार्याचा आणि महत्वाचे म्हणजे धम्म प्रचार प्रसार कार्याचा गौरव म्हणून हा पुरस्कार देण्यात आला.
सन्मानपत्र, डॉ बाबासाहेब आंबेडकर लिखित बुद्ध आणि त्याचा धम्म ग्रंथ,धम्म शाल , पुष्प गुच्छ,धम्मदान असे या पुरस्काराचे स्वरूप होते.या प्रसंगी ल. रा. जाधव गुरुजी यांचे सर्व कुटुंब आणि जय भीम उत्कर्ष मंडळ किनळे चे पदाधिकारी सचिन जाधव ,प्रा.आनंद जाधव, सुमित्रा जाधव भारतीय बौद्ध महासभा सावंतवाडी चे माजी तालुकाध्यक्ष प्रा . बी पी कांबळी सर , प्रकाश जाधव,शंकर जाधव ,सुप्रिया जाधव जयंत जाधव ,विनय जाधव,स्नेहल कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते.
बहुजन हिताय बौद्ध मंडळ कदमवाडी तिवरे यांच्या विद्यमाने समस्त शोषित पीडित बहुजन वर्गाच्या कल्याणासाठी आयुष्य झिजवलेल्या सर्व आदर्शांचा संयुक्त जयंती महोत्सव सोहळा शनिवार दिनांक 10 मे 2025 रोजी मोठ्या उत्साहात पार पडला. दोन सत्रात संपन्न झालेल्या सोहळ्याचे उद्घाटन सेवानिवृत्त सैनिक वसंत कदम यांच्या हस्ते धम्म ध्वजारोहण करून करण्यात आले. बौद्ध पूजा पाठ संपन्न झाल्यानंतर जाहीर सभा घेण्यात आली या सभेत आबाल वृद्धांनी महामानवांप्रती आपले मौलिक विचार मांडले. समृद्धी कदम पुनित तांबे स्वरा कदम आयुष कदम प्रमिला कदम सुश्मिता कदम सौरभ कदम डि के जाधव सदानंद जाधव ,सचिन जाधव,प्रा बी पी कांबळी ,सुप्रिया जाधव यांनी मनोगत व्यक्त केली.
