फ्रेंडस् सर्कल-देवगड सडा यांच्यावतीने प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून २६ जानेवारी रोजी उमाबाई बर्वे लायब्ररी हॉल येथे देवगड तालुका मर्यादित खुल्या गटातील भव्य कॅरम स्पर्धा 

 

देवगड / प्रतिनिधी

फ्रेंडस् सर्कल-देवगड सडा यांच्यावतीने प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून २६ जानेवारी रोजी उमाबाई बर्वे लायब्ररी हॉल येथे देवगड तालुका मर्यादित खुल्या गटातील भव्य कॅरम स्पर्धा 

फ्रेंडस् सर्कल- देवगड सडा यांच्यावतीने प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून २६ जानेवारी रोजी सकाळी १० वा. पासून येथील उमाबाई बर्वे लायब्ररी हॉल येथे देवगड तालुका मर्यादित खुल्या गटातील भव्य कॅरम स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत. ही स्पर्धा एकेरी व दुहेरी अशा दोन गटात होणार आहे.

एकेरी गटातील प्रथम, द्वितीय क्रमांकांना अनुक्रमे २,००१ रू, १५०१ रू., तसेच तृतीय व चतुर्थ क्रमांकांना प्रत्येकी ५०१ रू. चे बक्षीस देण्यात येईल. दुहेरी गटातील प्रथम, द्वितीय क्रमाकांना अनुक्रमे ३,००१ रू., १५०१ रू., तर तृतीय व चतुर्थ क्रमांकांना प्रत्येकी ५०१ रू. चे बक्षीस देण्यात येईल. या स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी रजपूत विरुद्ध यादव असा प्रेक्षणीय सामना रंगणार आहे. अधिक माहितीसाठी राजेश तारी (९४२०२६००८०), प्रकाश प्रभू (९४२००३७१८१) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन फ्रेंडस् सर्कल- देवगड सडा यांच्यावतीने करण्यात आले आहे.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *