देवगड (प्रतिनिधी)
देवगड बर्वे ग्रंथालय येथे १० जानेवारी पासून दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर व्याख्यानमालेचे आयोजन
जांभेकर व्याख्यानमालेची १४ वर्षाची परंपरा बर्वे ग्रंथालयाने आजही जपलीय – माजी आमदार अजित गोगटे
देवगड तालुक्याचे सुपुत्र आद्यपत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या स्मरणार्थ देवगड येथे उमाबाई बर्वे ग्रंथालय, स्नेहसंवर्धक सभागृह आणि राष्ट्रीय संस्कार संवर्धन मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने तीन दिवसीय दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर व्याख्यानमालेचे आयोजन १०,११ व १२ जानेवारी या कालावधी सायंकाळी ६ ते ८ या वेळेत बर्वे ग्रंथालयाच्या समोरील स्नेहसंवर्धक मंडळाच्या पटांगणात करण्यात आले असल्याची माहिती बर्वे ग्रंथालयाच्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेत ग्रंथालयाचे अध्यक्ष परुळेकर यांनी दिली.
यावेळी पत्रकार परिषदेस बाळशास्त्री जांभेकर व्याख्यानमालेचे समन्वयक माजी आमदार अँड अजित गोगटे, गणेश उर्फ भाई बांदकर ,सौ उत्तरा जोशी, महेश कानिटकर,चारुदत्त सोमण,महेश खोत आदी उपस्थित होते.
या व्याख्यानमालेमध्ये शुक्रवार दिनांक १० जानेवारी रोजी कृत्रिम बुद्धिमत्ता भविष्यातील आव्हाने व संधी या विषयावर पुणे येथील सुप्रसिद्ध साहित्यिक अच्युत गोडबोले यांचे व्याख्यान होणार आहे. शनिवार दिनांक ११ जानेवारी भारतीय शिक्षण व्यवस्थेसमोरील आव्हाने व नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण या विषयावर ठाणे येथील प्राध्यापक मंदार भानुष्य यांचे व्याख्यान होणार आहे.
रविवार १२ जानेवारी रोजी जागतिक जागतिक भान असलेली गावे आणि भगीरथ प्रतिष्ठानचे प्रयोग या विषयावर कुडाळ येथील डॉक्टर प्रसाद देवधर यांचे व्याख्यान होणार आहे.
तसेच ९ ते १३ जानेवारी या कालावधीत शब्दांगन पुणे आयोजित पुस्तकांचे प्रदर्शन व विक्री विविध विषयांची नामवंत लेखक व प्रकाशकांची हजारो पुस्तकांची प्रदर्शन व विक्री देखील या ठिकाणी होणार आहे. जास्तीत जास्त देवगड तालुक्यातील जनतेने या व्याख्यानमालेच्या लाभ घ्यावा. असे आयोजकांच्या वतीने कळविण्यात आले.
आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या नावाने व्याख्यानमाला सुरू करणारे सिंधुदुर्गातील उमाबाई बर्वे हे पहिले ग्रंथालय माजी आमदार अजित गोगटे
दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांची देवगड तालुक्यातील पोंभुर्ले ही जन्मभूमी आहे.याच अनुषंगाने २०११ पासून उमाबाई बर्वे ग्रंथालय, स्नेहसंवर्धक मंडळ व राष्ट्रीय संस्कार संवर्धन मंडळ देवगड यांच्या संयुक्त विद्यमाने अध्यपत्रकार दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या व्याख्यानमालीची सुरुवात केली. आज या व्याख्यानमालेचे १४ वे वर्ष आहे. सामाजिक, शैक्षणिक, ऐतिहासिक, धार्मिक,अशा अशा विषयावर प्रसिद्ध व्याख्याते आणून ही व्याख्याने आयोजित केली जात आहे. सांगताना अभिमान वाटतो दर्पणकार आद्यपत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांची जन्मभूमी असलेल्या देवगड तालुक्यात बाळशास्त्री जांभेकर यांच्या नावाने व्याख्यानमाला आयोजित करून ती परंपरा १४ वर्षे सातत्याने जपणारे उमाबाई बर्वे ग्रंथालय हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिले ग्रंथालय असल्याची माहिती बाळशास्त्री जांभेकर व्याख्यानमालेचे समन्वयक माजी आमदार अँड अजित गोगटे यांनी यावेळी दिली.
Post Views: 189
