बहुजन हिताय बौद्ध मंडळ कदमवाडी तिवरे यांना महाधम्मरक्खिता पुरस्कार प्रदान

0 minutes, 0 seconds Read

 

देवगड (प्रतिनिधी)

बहुजन हिताय बौद्ध मंडळ कदमवाडी तिवरे यांना महाधम्मरक्खिता पुरस्कार प्रदान

जय भीम उत्कर्ष मंडळ किनळे व ल.रा. जाधव गुरुजी परिवार यांच्या वतीने देण्यात येणारा ल.रा. जाधव गुरुजी स्मृती महाधम्मरक्खिता पुरस्कार या वर्षी बहुजन हिताय बौद्ध मंडळ कदमवाडी तिवरे या मंडळास प्रदान करण्यात आला.मंडळाने केलेल्या सामाजिक शैक्षणिक आर्थिक वैचारिक कार्याचा आणि महत्वाचे म्हणजे धम्म प्रचार प्रसार कार्याचा गौरव म्हणून हा पुरस्कार देण्यात आला.

सन्मानपत्र, डॉ बाबासाहेब आंबेडकर लिखित बुद्ध आणि त्याचा धम्म ग्रंथ,धम्म शाल , पुष्प गुच्छ,धम्मदान असे या पुरस्काराचे स्वरूप होते.या प्रसंगी ल. रा. जाधव गुरुजी यांचे सर्व कुटुंब आणि जय भीम उत्कर्ष मंडळ किनळे चे पदाधिकारी सचिन जाधव ,प्रा.आनंद जाधव, सुमित्रा जाधव भारतीय बौद्ध महासभा सावंतवाडी चे माजी तालुकाध्यक्ष प्रा . बी पी कांबळी सर , प्रकाश जाधव,शंकर जाधव ,सुप्रिया जाधव जयंत जाधव ,विनय जाधव,स्नेहल कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते.

 

बहुजन हिताय बौद्ध मंडळ कदमवाडी तिवरे यांच्या विद्यमाने समस्त शोषित पीडित बहुजन वर्गाच्या कल्याणासाठी आयुष्य झिजवलेल्या सर्व आदर्शांचा संयुक्त जयंती महोत्सव सोहळा शनिवार दिनांक 10 मे 2025 रोजी मोठ्या उत्साहात पार पडला. दोन सत्रात संपन्न झालेल्या सोहळ्याचे उद्घाटन सेवानिवृत्त सैनिक वसंत कदम यांच्या हस्ते धम्म ध्वजारोहण करून करण्यात आले. बौद्ध पूजा पाठ संपन्न झाल्यानंतर जाहीर सभा घेण्यात आली या सभेत आबाल वृद्धांनी महामानवांप्रती आपले मौलिक विचार मांडले. समृद्धी कदम पुनित तांबे स्वरा कदम आयुष कदम प्रमिला कदम सुश्मिता कदम सौरभ कदम डि के जाधव सदानंद जाधव ,सचिन जाधव,प्रा बी पी कांबळी ,सुप्रिया जाधव यांनी मनोगत व्यक्त केली.

 

सायंकाळी द्वितीय सत्रात विविध स्पर्धांमध्ये यशस्वी झालेले विद्यार्थी पालक महिला वर्गाचा यथोचित भेटवस्तू देऊन सन्मान सत्कार करण्यात आला. त्यानंतर झालेल्या अभिवादन सभेत कणकवली तालुका बौद्ध जन विकास मंडळ मुंबई अध्यक्ष अनिल तांबे यांनी मंडळास मिळालेल्या पुरस्काराबाबत अभिनंदन केले मंडळाच्या विविध कार्याविषयी गौरवोद्गार काढले. रवींद्र आंबेलकर सरपंच तिवरे,विद्याधर तांबे विकास गुरव ,योगेश चव्हाण , विनिया तांबे यांनीही आपली मनोगते व्यक्त केली.

जयंती महोत्सवाच्या यशस्वीतेसाठी ललिता कदम,संकेत कदम रजत कदम शैलेश तांबे वृंदा कदम सुशांत कदम संजय कदम गुणाजी वनकर अरविंद कदम सचिन कदम शुभम कदम वैभव कदम यांचे उत्तम सहकार्य लाभले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन त्याचे बदल अक्षदा कदम सौरभ कदम यांनी केले तर ऋतुजा कदम यांनी आभार व्यक्त केले.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *