श्री देवी माऊली मंदिर वाफोलीचा वर्धापन दिन सोहळा १२ मे रोजी उत्साहात साजरा होणार धार्मिक विधी, भजने आणि दशावतारी नाटकाचा समावेश 

0 minutes, 0 seconds Read

 

बांदा, ११ मे | प्रतिनिधी

श्री देवी माऊली मंदिर वाफोलीचा वर्धापन दिन सोहळा १२ मे रोजी उत्साहात साजरा होणार
धार्मिक विधी, भजने आणि दशावतारी नाटकाचा समावेश 

वाफोली येथील श्री देवी माऊली मंदिराचा वर्धापन दिन सोहळा सोमवार, दिनांक १२ मे रोजी मोठ्या श्रद्धा आणि उत्साहात साजरा होणार आहे. या निमित्ताने मंदिर परिसरात संपूर्ण दिवसभर धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

कार्यक्रमाचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे :

सकाळी ८.०० वाजता – प्रायश्चित्त विधी, यजमानांची शरीरशुद्धी, देवतांचे आवाहन व प्रार्थना, गणपती पूजन, पुण्याहवाचन, संभारदान, आचार्यवरण, प्राकारस्थलशुद्धी, देवतास्थापना, देवी माऊली व परिवार पूजन, अग्नीस्थापन, वास्तु हवन, ग्रहयज्ञ, तत्वहोम, बलिदान, पूर्णाहुती, अभिषेक, महानैवेद्य, आरती, देवता प्रार्थना, आशीर्वाद व तीर्थप्रसाद.

सकाळी ९.०० वाजता – श्री सत्यनारायण महापूजा

दुपारी १.३० वाजता – महाप्रसाद

सायंकाळी ७.०० वाजता – स्थानिक भजनी मंडळांचे सुश्राव्य भजने

रात्रौ ९.०० वाजता – आजगावकर दशावतार नाट्य मंडळ यांचे सादरीकरण

या सोहळ्यात उपस्थित राहून भाविकांनी अध्यात्मिक लाभ घ्यावा, असे आवाहन श्री देवी माऊली पंचायतन स्थानिक सल्लागार उपसमितीचे अध्यक्ष विलास गवस, प्रमुख मानकरी, वाफोली हितवर्धक ग्रामस्थ संस्था, मुंबई व वाफोली ग्रामस्थ यांनी केले आहे.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *