शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त देवगड तालुक्यात रक्तदान शिबिर व भजन स्पर्धेचे आयोजन

0 minutes, 1 second Read

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त देवगड तालुक्यात रक्तदान शिबिर व भजन स्पर्धेचे आयोजन

युवासेना चषक भजन स्पर्धा – २०२४

 

देवगड (प्रतिनिधी) २० जुलै २०२४

 

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने शिवसेना-युवासेना देवगड तालुक्याच्या वतीने भव्य भजन स्पर्धा व रक्तदान शिबिराचे आयोजन सोमवार २९ जुलै २०२४ रोजी इंद्रप्रस्थ हॉल, सातपायरी, देवगड करण्यात आले आहे.
ही भजन स्पर्धा देवगड तालुका मर्यादित असून या युवासेना चषक भजन स्पर्धा २०२४ साठी प्रथम क्रमांकासाठी रुपये १५,१११, सन्मान चिन्ह, द्वितीय क्रमांक रुपये १०,१११ सन्मान चिन्ह,तृतीय क्रमांक रुपये ५,१११ सन्मान चिन्ह, उत्तेजनार्थ रुपये २,१११ सन्मान चिन्ह अशी बक्षीसे ठेवण्यात आली आहेत .याबरोबर तबला, पखवाज, तालरक्षक, कोरस, शिस्तबद्ध संघ यासाठी वैयक्तिक पारितोषिक रोख रुपये व सन्मान चिन्ह देण्यात येणार आहेत..
या भजन स्पर्धेसाठी नियम व अटी खालील प्रमाणे भजन स्पर्धेचा कालावधी ३० मिनिटे राहील. प्रथम येणाऱ्या १५ संघांना प्रवेश देण्यात येईल.अधिक माहितीसाठी युवा सेना तालुकाप्रमुख गणेश गांवकर – ९७७३२७२३३८ यांचेशी संपर्क साधावा. या स्पर्धेत जास्तीत जास्त भजन मंडळांनी सहभाग घ्यावा असे आवाहन शिवसेना तालुका प्रमुख मिलिंद साटम,जयेश नर, महिला तालुका प्रमुख हर्षा ठाकूर, सायली घाडीगांवकर, युवासेना तालुका प्रमुख गणेश गांवकर, फरीद काझी यांनी केले आहे.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *