कणकवली ( प्रतिनिधी)
सामाजिक कार्यकर्ते कै. सत्यविजय भिसे यांचा २३ वा. स्मृतिदिन शनिवार दि. २२ नोव्हेंबर रोजी शिवडाव येथे कै. सत्यविजय भिसे मित्रमंडळ (शिवडाव) यांच्यावतीने साजरा करण्यात येणार आहे.
यानिमित्त रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.शनिवार दि.२२ नोव्हेंबर रोजी सकाळी ९ वाजता कै. सत्यविजय भिसे यांच्या प्रतिमेला मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली अर्पण करण्यात येणार आहे.त्यानंतर रक्तदान शिबिराचे उद्घाटन होणार आहे.
शिवडाव ग्रामस्थांनी आणि सत्यविजय भिसे प्रेमींनी श्री.बाळा भिसे निवासस्थान ,शिवडाव राऊतखोलवाडी येथे मोठ्या संख्येने उपस्थित राहुन रक्तदान शिबिरात सहभागी व्हावे.आणि रक्तदान करावे.असे आवाहन कै.सत्यविजय भिसे मित्र मंडळ शिवडाव यांच्यावतीने करण्यात आले आहे.
