कणकवली (प्रतिनिधी)“लढाईत कोण नसतं आपलं… समोर कोण आहे याची चिंता करू नका… जीवाचं करू रान, रक्ताचं करू पाणी आणि संदेश पारकरांना नगराध्यक्षपदी निवडून आणा!” अशा आक्रमक शब्दांत शिवसेनेचे फायरब्रॅण्ड आमदार निलेश राणे यांनी कणकवलीत जोरदार गर्जना केली.
शहर विकास आघाडीची भव्य बैठक राजन तेली यांच्या निवासस्थानी पार पडली. या बैठकीला ठाकरे व शिंदे गटातील शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. निलेश राणेंच्या उपस्थितीने आघाडीचे प्रभावी शक्तिप्रदर्शन झाले.
आमदार निलेश राणे म्हणाले की, “नगराध्यक्षपदासाठी संदेश पारकरांना विजयी करण्यासाठी सर्वांनी एकदिलाने कामाला लागा.”राजकारणात कधी नाही केली तडजोड केली नाही मात्र ज्यांनी दगा दिला त्यांचा आता कायमचा बंदोबस्त करा.गरज पडली तर मला बोलवा, रथी-महारथी कणकवलीत उतरवू.विजयासाठी विकासाचा मुद्दा सर्वात महत्वाचा आहे.श्रीकृष्णांचा आदर्श घ्या; शेवटपर्यंत लढणाऱ्यांचीच कणकवली साथ करते.असेही आमदार निलेश राणे म्हणाले.
सारे विरोधक सत्ताधाऱ्याविरोधात एकटवल असून या बैठकीत शहर विकास आघाडीने यंदा निवडणुकीत “तडजोड नाही, सरळ लढाई” असा संदेश देत एकजूटीचे दर्शन घडवले.आमदार निलेश राणेंच्या दमदार भाषणामुळे कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.
