{"remix_data":[],"remix_entry_point":"challenges","source_tags":[],"origin":"unknown","total_draw_time":0,"total_draw_actions":0,"layers_used":0,"brushes_used":0,"photos_added":0,"total_editor_actions":{},"tools_used":{"transform":1},"is_sticker":false,"edited_since_last_sticker_save":true,"containsFTESticker":false}

भाजप उमेदवार सुधीर आडिवरेकर यांनी केला प्रचारास प्रारंभ

सावंतवाडी  (मंगल कामत)

भाजप उमेदवारांच्या प्रचाराला उत्साहपूर्ण सुरुवात झाली आहे.सावंतवाडीतील प्रभाग क्र. ५ मध्ये भाजपच्या उमेदवारांनी प्रचाराची धडाकेबाज सुरुवात केली. नगरसेवक पदाचे भाजपचे उमेदवार आणि माजी नगरसेवक सुधीर आडीवरेकर यांनी नारळ फोडून प्रचार मोहीमेचा शुभारंभ केला. नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार युवराणी सौ. श्रद्धाराजे भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम पार पडला.

श्री देव नरसोबा मंदिरात श्रीफल वाढवून धार्मिक विधीने प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला. याप्रसंगी नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ. श्रद्धाराजे भोसले, महिला नगरसेवक पदाच्या उमेदवार दुलारी रांगणेकर यांनीही जनसंपर्काला सुरूवात केली.

या कार्यक्रमाला युवराज लक्षणराज भोसले, करन आजगावकर, अमित गावडळेकर, किशोर चिटणीस, सचिन कुलकर्णी, सुदेश नेवगी, सुमित वाडकर, मया डुबळे, महेश बांदेकर, नागेश जगताप, साई परब, सुधीर मळीकर अशांसह प्रभागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *