कणकवली (प्रतिनिधी)
प्रशासकीय निष्क्रियतेच्या विरोधात फोंडाघाट चे समीर सामंत यांचे तारीख १ ऑक्टोबर पासून आमरण उपोषणाला सुरुवात !
फोंडाघाट ग्रामपंचायतने शासकीय धर्मशाळेच्या जागेवर केलेले अतिक्रमण केवळ बेकायदेशीर नसून, विद्यमान कायद्यांचे उल्लंगन उघडपणे करणारे आहे. यापूर्वी अनेकदा विनंती – अर्ज करून देखील जिल्हाधिकारी कार्यालयाकडून प्रांत– तहसीलदार– पीडब्ल्यूडी– तलाठी– ग्रामसेवक– सरपंच यांची कार्यालये यांना व परत मागे अशी पत्रांची टोलवाटोलवी सुरू आहे. मात्र या प्रशासकीय निष्क्रियतेमुळे यावर कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही.
त्यामुळे माझ्या तक्रारीवर ठोस कारवाई न झाल्यास, तारीख ०१- १०- २५ पासून जिल्हाधिकारी कार्यालय समोर आमरण उपोषणास बसण्याचा निर्णय सामंत यांनी घेतल्याचे तारीख १२- ०९- २५ च्या पत्राद्वारे कळविले आहे. व त्याच्या प्रती माहितीसाठी सिंधुदुर्ग पालकमंत्री नितेश राणे, मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प. सिंधुदुर्ग, पोलीस अधीक्षक- ओरस, पोलीस निरीक्षक ओरस, गटविकास अधिकारी कणकवली, तहसीलदार कणकवली यांना दिल्या आहेत.

