सावंतवाडी (प्रतिनिधी)
ग्रामपंचायत मळेवाड कोंडुरे कडून स्वच्छ वॉर्ड स्पर्धेचे आयोजन
सध्या संपूर्ण महाराष्ट्रात मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान सुरू असून सेवा पंधरवडा अंतर्गत प्रत्येक दिवशी नेमून दिलेल्या उपक्रमांतर्गत ग्रामपंचायत मार्फत गावा गावात मार्फत उपक्रम राबवले जात आहेत. सावंतवाडी तालुक्यातील ग्रामपंचायत मळेवाड कोंडुरे कडून सेवा पंधरवडा तील उपक्रम हे राबवले जात असतानाच ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील चार वॉर्ड करिता स्वच्छ वॉर्ड स्पर्धा चे आयोजन करण्यात आले आहे.
तसेच स्वच्छ घर स्वच्छ अंगण स्पर्धा आयोजित केली आहे.तरी या स्पर्धेत जास्तीत जास्त ग्रामस्थानी सहभाग घ्यावा.वॉर्ड स्पर्धे मध्येही ग्रामस्थांनी उस्फूर्त प्रतिसाद देऊन सहभागी होत आपला बोर्ड स्वच्छ राहील या दृष्टीने नियोजन करावे असे आवाहन सरपंच सौ मिलन पार्सेकर यांनी केले आहे.
