सडूरे शिराळे ग्रामपंचायतीच्या पर्यटन वेबसाईटचे पर्यटनदिनी पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते लोकार्पण ; कोकणी रानमाणूस प्रसाद गावडे यांची प्रमुख उपस्थिती

 

वैभववाडी (प्रतिनिधी)

 

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान २०२५ अंतर्गत ग्रुप ग्रामपंचायत सडूरे शिराळे यांच्या पर्यटन वेबसाईटचा लोकार्पण सोहळा मत्स्य व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते संपन्न होणार आहे.

 

शनिवार दि. २७ सप्टेंबर २०२५ रोजी जागतिक पर्यटन दिनाचे औचित्य साधून संपन्न होणाऱ्या या कार्यक्रमाला सुप्रसिद्ध ब्लॉगर कोकणी रानमाणूस अर्थात प्रसाद गावडे यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. हा सोहळा श्री देव रवळनाथ मंदिर सभागृह (सडूरे ग्रामपंचायत नजिक) येथे सकाळी १० वाजता पार पडणार आहे.

 

कार्यक्रमाला विशेष निमंत्रित म्हणून गटविकास अधिकारी रामचंद्र जंगले, तहसीलदार सूर्यकांत पाटील, पोलीस निरीक्षक मनोज सोनवलकर, भाजपा तालुकाध्यक्ष सुनील नकाशे, तसेच वेबसाईट निर्माते गुलजार निजाम काझी आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

 

पर्यटन विकासाला चालना देण्यासाठी ग्रामपंचायत स्तरावर उभारण्यात आलेल्या या वेबसाईटच्या माध्यमातून पर्यटकांना गावातील विविध पर्यटन स्थळांची माहिती सुलभतेने मिळणार आहे. त्याआधारे स्थानिकांना रोजगार संधीही उपलब्ध होण्याची अपेक्षा आहे.

 

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *