कणकवली (तुळशीदास कुडतरकर)
एआय तंत्रज्ञानाचा योग्य वापर करावा – विनय सामंत
एआय तंत्रज्ञान हे मानवाच्या कल्याणासाठी आहे. मात्र, या तंत्रज्ञानाचा योग्य वापर करावा, असा सल्ला आयआयटी (आयएसएम) धनबाद येथील सीनिअर प्रोडयूसर मॅनेजर विनय सामंत यांनी दिला.कणकवली तालुका व्यापारी संघ, शिक्षण प्रसारक मंडळाचे कणकवली कॉलेज, कणकवली यांच्या संयुक्त विद्यमाने एआय माणसाच्या भविष्यासाठी कसा आकार घेत आहे या विषयावर विनय सामंत यांचा कणकवली महाविद्यालयाच्या एचपीसीएल सभागृहात वेबिनार आयोजित केला होता. वेबिनारचे उद्घाटन विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या हस्ते झाले.
