रोटरी क्लब वैभववाडीचा नुतन पदग्रहण सोहळा १३ जुलै रोजी, सचिन रावराणे अध्यक्षपदी

0 minutes, 0 seconds Read

 

वैभववाडी (तुषार शिंगाडे)

रोटरी क्लब वैभववाडीचा नुतन पदग्रहण सोहळा १३ जुलै रोजी, सचिन रावराणे अध्यक्षपदी

रोटरी क्लब ऑफ वैभववाडीचा नुतन पदग्रहण सोहळा दि. १३ जुलै २०२५ रोजी, हॉटेल महालक्ष्मी सभागृह, वैभववाडी येथे सायंकाळी ७ वाजता पार पडणार आहे. २०२५-२६ या कार्यकाळासाठी सचिन रावराणे अध्यक्ष, डॉ. नामदेव गवळी सचिव आणि स्नेहल सुनील रावराणे खजिनदार म्हणून कार्यभार स्वीकारणार आहेत.
नवीन पदाधिकाऱ्यांना पदभार विक्रांतसिंह कदम यांच्या हस्ते प्रदान करण्यात येईल. याप्रसंगी जिल्ह्यातील विविध रोटरी क्लब्सचे पदाधिकारी, सदस्य आणि मान्यवर उपस्थित राहणार आहेत. मावळते अध्यक्ष प्रशांत गुळेकर यांनी नूतन कार्यकारिणीला शुभेच्छा दिल्या आहेत.
कार्यक्रमात “आदर्श ग्रामविकास अधिकारी” म्हणून गजानन कोलते यांचा विशेष सन्मान करण्यात येणार आहे. तसेच शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या निहाल प्रकाश रावराणे आणि आर्य दीपक मोरे या दोन गुणवंत विद्यार्थ्यांचाही गौरव केला जाणार आहे, अशी माहिती नूतन अध्यक्ष सचिन रावराणे यांनी दिली. सदरहू पदनियुक्ती रोटरी इंटरनॅशनलच्या “रोटेशन पॉलिसी” या धोरणानुसार करण्यात आली आहे.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *