राष्ट्रीय युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण टेंबुलकर यांनी केलेले उपोषण तूर्तास स्थगीत 

0 minutes, 3 seconds Read

 

देवगड (प्रतिनिधी) १५ ऑगस्ट २०२४

 

 

राष्ट्रीय युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण टेंबुलकर यांनी केलेले उपोषण तूर्तास स्थगीत 

 

 

राष्ट्रवादी काँग्रेस ज्येष्ठनेते नंदकुमार घाटे, युवासेना जिल्हाध्यक्ष सुशांत नाईक, यांनी उपोषण स्थळी भेट दिला पाठिंबा

 

 

भारत माता की जय, वंदे मातरम, अशी घोषणाबाजी करत मुख्य रस्त्यापासून देवगड पंचायत समिती पर्यंत रॅली काढत किंजवडे मधील दीडशे ग्रामस्थ स्वातंत्र्यदिनी न्यायासाठी देवगड पंचायत समिती येथे लाक्षणीय उपोषणास बसले होते.देवगड तालुक्यातील किंजवडे बाईतवाडी खालची कदमवाडी या ठिकाणी जाणारा अन्नपूर्णा नदीवरील साकव पूर्णतः जीर्ण झाला असून मोडकळीस आला आहे. या ठिकाणी बऱ्याच ग्रामस्थांची शेती व घरे असून येण्याजाण्यासाठी हा सोयीस्कर मार्ग आहे. मात्र पूर्णतः जीर्ण होऊन देखील याकडे शासन लक्ष न देत असल्याने राष्ट्रीय युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण टेंबुलकर यांनी स्वातंत्र्यदिनी देवगड पंचायत समिती समोर लाक्षणिक उपोषण केले. या साकवा संदर्भात आवश्यकता कागदपत्रांची पूर्तता तात्काळ करून या साकवाजी तात्पुरती डागडुजी व त्यानंतर नवीन प्रस्तावाचा पाठविला जाईल असे लेखी आश्वासन गटविकास अधिकारी यांनी दिल्यानंतर तूर्तास राष्ट्रीय युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण टेंबुलकर यांनी केलेले उपोषण तात्पुरते स्थगित केले आहे.

 

किंजवडे बाईतवाडी खालची कदमवाडी या दोन वाड्यांना जोडणारा अन्नपूर्णा नदीवरील साकव पूर्णता जीर्ण होऊन नादुरुस्त स्वरूपाचा झाला आहे. या साकवा वरून जीव मुठीत घेऊन ग्रामस्थांना व शाळकरी विद्यार्थ्यांना पलीकडच्या प्रवास करावा लागतो. या साकवाची नव्याने दुरुस्ती व्हावी याबाबत येथील ग्रामस्थ व काँग्रेस युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण टेंबुलकर यांनी तीन वर्षे पूर्वी आवाज उठवला होता. मात्र प्रशासनाच्या नाकर्तेपणामुळे हा प्रश्न मार्गी नाव लागला नाही. त्यामुळे पुन्हा एकदा किरण टेंबुलकर यांनी यासंदर्भात आवाज उठवला होता. त्यानंतर या पुलाची आमदार नितेश राणे यांनी पाहणी केली किंजवडे सरपंच यांनी याबाबत खासदार नारायण राणे यांना या ठिकाणी मायनर ब्रीज व्हावा यासाठी निवेदन दिले होते. पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांना देखील याबाबत निवेदन दिले होते.तरीही कोणताही पाठपुरावा अदयाप जिल्हा परिषद मधून झालेला दिसत नसल्याने स्वातंत्र्यदिनी अखेर मला हे उपोषण करावे लागले असल्याचे किरण टेंबुलकर यांनी सांगितले.

 

सकाळी ९ :३०वाजता राष्ट्रीय युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण टेंबुलकर व किंजवडे ग्रामस्थ यांनी देवगड पंचायत समिती समोर या साकवाबाबत लाक्षणीय उपोषण केले होते. या उपोषणस्थळी उद्धव ठाकरे युवासेनेचे जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, तालुकाप्रमुख गणेश गावकर, अँड प्रसाद करंदीकर ,नगरसेवक बुवा तारी,राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नंदकुमार घाटे यांनी भेट देत टेंबुलकर यांच्या उपोषणाला पाठिंबा दिला होता.

 

दरम्यान उपोषण स्थळी गटविकास अधिकारी वृक्षाली यादव, देवगड पोलीस निरीक्षक अरूण देवकर, सहाय्यक गटविकास अधिकारी व संबंधित प्रशासकीय अधिकारी यांनी उपोषणकत्ते टेंबुलकर यांची भेट घेतली. त्यांच्याशी यशस्वी संवाद साधला. या साकवाची उद्या पहाणी केली जाईल.त्यानंतर साकवा बाबत दोन प्रस्ताव पाठविले जातील. त्यातील डागडुजीसाठी पहिला प्रस्ताव उद्या १६ ऑगस्टला पाठविला जाईल. व त्यानंतर आठ दिवसांनी या साकवाच्या मंजुरीचा नवीन प्रस्ताव पाठविला जाईल.असे लेखी आश्वासन गटविकास अधिकारी वृक्षाली यादव यांनी दिल्यानंतर तूर्तास किरण टेंबुलकर यांनी हे उपोषण मागे घेतले आहे. मात्र याबाबत कोणतीही कृती दिसली नाही. तर ग्रामस्थांना घेऊन तीव्र आंदोलन करणार असल्याचा इशाराही यावेळी किरण टेंबुलकर यांनी दिला.
यावेळी राष्ट्रीय काँग्रेस तालुकाध्यक्ष उमेश कुलकर्णी तुषार भाबल राष्ट्रीय काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष अरुण टेंबुलकर, विजय सुर्वे, गिरीश चव्हाण, मंगेश पाटणकर, उपसरपंच दत्तात्रय कदम, संजय आचरेकर ,मंगेश सुर्वे ,महेश ठुकरूल, गुरुप्रसाद पाडावे अजय राऊळ, दीपक घाडी ,शेखर ठाकूर, सागर सुर्वे ,रावजी यादव ,अशोक घाडी, प्रशांत पाटणकर आदींसह किंजवडे मधील सुमारे १५० ग्रामस्थ या उपोषण स्थळी उपस्थित होते.

 

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *