भाजपा प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण यांच्या निवडीनंतर देवगडात भाजपाचा जल्लोष
सिंधुदूर्गचे सुपुत्र तथा नवनिर्वाचित भाजपा प्रदेशाध्यक्ष मा.रविंद्र चव्हाण यांनी आज भाजपा प्रदेशाध्यक्ष पदाचा पदभार स्विकारला याचा आनंदोत्सव साजरा करण्यासाठी भाजपा कार्यालय जामसंडे येथे फटाक्यांच्या आतिषबाजीत कार्यकर्ते व नागरिकांना लाडू वाटप करून साजरा करण्यात आला.
यावेळी माजी आमदार अँड अजित गोगटे, सदाशिव ओगले, जिल्हा उपाध्यक्ष बाळ खडपे, सुनिल पारकर, संजय बांबूळकर, जिल्हा उपाध्यक्षा प्रियांका साळसकर, तालुकाध्यक्ष राजा भुजबळ,महिला मोर्चा अध्यक्ष उष:कला केळुस्कर, उपनगराध्यक्षा मिताली सावंत , नगरपंचायत गटनेते शरद ठुकरुल, नगरसेविका आद्या गुमास्ते, तन्वी चांदोस्कर,रुचाली पाटकर,व्ही सी खडपकर, माजी नगराध्यक्ष योगेश चांदोस्कर, शहर युवा अध्यक्ष दया पाटील,वैभव करंगुटकर, शहर उपाध्यक्ष मृणाली भडसाळे, शक्तिकेंद्र प्रमुख गणपत गावकर, संजय तारकर, ज्ञानेश्वर खवळे,महेश ताम्हणकर,बूथ अध्यक्ष योगेश घाडी, रविंद्र चिंदरकर, रविंद्र कोयंडे अनुप बापट, बाळा पाताडे आदी उपस्थित होते.