मुस्लिमांच्याविरोधात सतत कडवट भूमिका घेणाऱ्या मंत्री राणे यांनी सौगाद-ए-मोदी कीट वाटपाला विरोध का केला नाही? – परशुराम उपरकर
मागील सहा महिन्यांपासून पालकमंत्र्यांचे अपयश जनतेला दिसू लागले ; अपयशी पालकमंत्री म्हणून त्यांची वाटचाल सुरु झाली
मुस्लिमांच्याविरोधात सतत कडवट भूमिका घेणाऱ्या मंत्री राणे यांनी सौगाद-ए-मोदी कीट वाटपाला विरोध का केला नाही? असा सवाल माजी आमदार परशूराम उपरकर यांनी केला.येथील संपर्क कार्यालयात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत श्री. उपरकर बोलत होते. उपरकर म्हणाले, हिंदूंचे गब्बर म्हणून मिरवणारे मंत्री नितेश राणे यांनी गुढीपाडव्याच्या दिवशी जनतेला शासनाने आनंदाचा शिधा वाटप करावा, अशी मागणी करणे अपेक्षित होते. परंतु, त्यांनी याबाबत मागणी करणे टाळले. आता तर ईदनिमित्त मोदी सरकारने मुस्लिमांना सौगाद-ए-मोदी कीट वाटप केले. खरे तर नेहमीच मुस्लिमांच्याविरोधात कडवट भूमिका घेणाऱ्या मंत्री राणे यांनी सौगाद-ए-मोदी कीट वाटपाला विरोध करणे अपक्षित होते. पण तसे त्यांनी का केले नाही? याचे उत्तर द्यायला हवे.
मंत्री राणे यांनी औरंगजेबाच्या कबर हटविण्यासाठी आक्रमक भूमिका घेतली होती. तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्वराज्यात मुस्लिम नव्हते, असे विधान केले होते. आरएसएसने त्यांना समजुतीचे डोस पाजल्यामुळे मंत्री राणे यांनी आपल्या भूमिकेबद्दल घुमजाव केला आहे. औरंगजेबची कबर व स्वराज्यात मुस्लिम नव्हते यावरून जनतेचे लक्ष हटविण्यासाठी त्यांनी दिशा सालियान मृत्यू प्रकरणाचा विषय पुन्हा उखरून काढला आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील समुद्रामध्ये परराज्यांतील एलईडीद्वारे पर्ससीन मासेमारी करणाऱ्यांवर नौकांवर मत्स्य विभागाकड कारवाई केली जाते. मात्र, रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एलईडीद्वारे पर्ससीन मासेमारी करणाऱ्यांवर मत्स्य विभागाकडून द्यायला हवे.
मंत्री राणे यांनी औरंगजेबाच्या कबर हटविण्यासाठी आक्रमक भूमिका घेतली होती. तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्वराज्यात मुस्लिम नव्हते, असे विधान केले होते. आरएसएसने त्यांना समजुतीचे डोस पाजल्यामुळे मंत्री राणे यांनी आपल्या भूमिकेबद्दल घुमजाव केला आहे. आरंगजेबची कबर व स्वराज्यात मुस्लिम नव्हते यावरून जनतेचे लक्ष हटविण्यासाठी त्यांनी दिशा सालियान मृत्यू प्रकरणाचा विषय पुन्हा उखरून काढला आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील समुद्रामध्ये परराज्यांतील एलईडीद्वारे पर्ससीन मासेमारी करणाऱ्यांवर नौकांवर मत्स्य विभागाकडून कारवाई केली जाते. मात्र, रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एलईडीद्वारे पर्ससीन मासेमारी करणाऱ्यांवर मत्स्य विभागाकडून कारवाई केली जात नाही. त्यामुळे पारंपरिक मच्छीमारांनी मत्स्य विभागाच्या कारभाराबद्दल श्री. उपरकर यांनी नाराजी व्यक्त करीत त्यांनी आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
मंत्रिमंडळामध्ये मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास खात्याच्या मंत्र्यांचा १५ नंबर लागतो. त्यामुळे मंत्री राणे यांनी आपली कुवत, आवाका आणि उंचीप्रमाणे जनतेला शब्द द्यावेत, असा टोला उपरकर यांनी लगावला. मागील सहा महिन्यांपासून पालकमंत्र्यांचे अपयश जनतेला दिसू लागले असून त्यांची वाटचाल अपयशी पालकमंत्री म्हणून सुरू झाली असा टोलाही उपरकर यांनी लगावला.