वाडा हायस्कूल येथे दीक्षित फाउंडेशन तर्फे बालोद्यान भूमिपूजन

0 minutes, 0 seconds Read

वाडा हायस्कूल येथे दीक्षित फाउंडेशन तर्फे बालोद्यान भूमिपूजन

देवगड (प्रतिनिधी) १० जुलै २०२४

देवगड तालुक्यातील अ . कृ .केळकर हायस्कूल वाडा येथे नीता निळकंठ दीक्षित या बालोद्यान भूमिपूजनाचा कार्यक्रम संपन्न झाला .सदर कार्यक्रमाचे श्री मंदार जोशी यांनी धार्मिक पद्धतीने पूजन केले . दीक्षित फाउंडेशन अलीकडे शैक्षणिक क्षेत्रात वेगवेगळे उपक्रम राबवीत आहे .त्यातील हा एक अनोखा उपक्रम म्हणावयास हरकत नाही . श्री निरंजन दीक्षित यांच्या दातृत्वातून हे बालोद्यान आकार घेणार आहे .याप्रसंगी या बालोद्यान चे पूजन देवगड एज्युकेशन बोर्डाचे मुख्य चिटणीस श्री शंकर धुरी यांनी केले तर प्रमुख उपस्थिती देवगड एज्युकेशन बोर्डाचे उपाध्यक्ष माननीय श्री सदानंद पवार , वाडा स्थानीय समितीचे अध्यक्ष श्री शांताराम पुजारे ,शाला समितीचे सदस्य श्री हर्षद जोशी , वाडा हायस्कूलचा शिक्षक व शिक्षकेतर वृंद , वाडा प्रशालेचे मुख्याध्यापक श्री सुनील घस्ती तसेच विद्यार्थी उपस्थित होते .

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *