श्री श्रीपाद मठ, सावंतवाडी येथे श्री शनि जयंती उत्सवाचे आयोजन

0 minutes, 0 seconds Read

 

 

सावंतवाडी (प्रतिनिधी)

श्री श्रीपाद मठ, सावंतवाडी येथे श्री शनि जयंती उत्सवाचे आयोजन

– श्री श्रीपाद मठ, झिरंगवाडी, सावंतवाडी येथे यंदाची वैशाख अमावस्या, दिनांक 26 मे 2025 रोजी श्री शनि जयंती उत्सव मोठ्या भक्तिभावाने साजरा केला जाणार आहे. या निमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

या दिवशी “श्री रुद्र याग – स्वाहाकार” तसेच इतर धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन होणार असून, भाविकांनी या प्रसंगी दर्शन व तीर्थप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

कार्यक्रमाची रूपरेषा पुढीलप्रमाणे:

सायं. 4.30 ते 5.30: स्वामीकृपा प्रासादिक भजन मंडळ, हुगस – भजन सादर. सहभागी: श्री वैलोश नाईक, श्री गणेश नाईक (बुवा), श्री भूषण पचवे (परवाज), श्री प्रमेश हुगससकर (तबला).

सायं. 6.00: भजन सेवा – गोवर्धन प्रासादिक भजन मंडळ, वडखोल, वेगुर्ला. बुवा – श्री. रूपेश पचवे.

रात्रो 8.00: दशावतारी नाटक – गोकुळचा चोर. सादरकर्ते: जय हनुमान दशावतार नाट्य मंडळ, आरोस.

श्री श्रीपाद मठ येथे होणाऱ्या या कार्यक्रमास सर्व भक्तांनी उपस्थित राहून लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *