शिरवल गावचे सेवानिवृत्त पोलीस पाटील विजय शिरवलकर यांचे निधन 

0 minutes, 0 seconds Read

शिरवल गावचे सेवानिवृत्त पोलीस पाटील विजय शिरवलकर यांचे निधन 

 

कणकवली दि ११ ऑगस्ट (प्रतिनिधी)

 

शिरवल टेंबवाडी येथील रहिवासी तथा शिरवल गावचे सेवानिवृत्त पोलीस पाटील आणि श्री.विठ्ठल – रखुमाई मंदिर समितीचे ट्रस्टी श्री.विजय वसंत शिरवलकर (वय ६२) यांचे शनिवार १० ऑगस्ट रोजी सकाळी साडेअकरा वाजता शिरवल येथील निवासस्थानी हृदयविकाराच्या झटक्याने दुःखद निधन झाले .

विजय शिरवलकर हे सामाजिक,शैक्षणिक, सांस्कृतिक, धार्मिक कार्यक्रमा मध्ये पुढाकार असलेले अष्टपैलू व्यक्तिमत्त्व होते .गावातील सार्वजनिक कामात नेहमीच ते अग्रेसर होते. आपल्या पोलिस पाटील सेवेच्या ३० वर्षाच्या कालावधीत त्यांनी ग्रामस्थांना चांगली सेवा देताना सामाजिक सलोखा ठेवला.

सेवाभावी आणि मनमिळाऊ स्वभावामुळे ते परीचित होते.त्यांच्या जाण्याने शिरवल गावावर शोककळा पसरली . त्यांच्या पश्चात पत्नी, विवाहित मुलगा,मुलगी, सुन,जावई, तीन भाऊ,भावजय, नातवंडे असा परिवार आहे.शिरवल येथील स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर रविवारी दुपारी दोन वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी विविध क्षेत्रातील मंडळी उपस्थित होती. उपस्थितांनी विजय शिरवलकर यांना श्रद्धांजली वाहताना त्यांच्या आठवणींना उजाळा दिली

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *