स्वतः जिल्ह्याचा आका होण्यासाठी राणेंनी रवींद्र चव्हाण यांना पद्धतशीरपणे बाजूला केले ; माजी आमदार वैभव नाईक यांची राणेंवर खरमरीत टीका

0 minutes, 0 seconds Read

 

कणकवली ( प्रतिनिधी)

स्वतः जिल्ह्याचा आका होण्यासाठी राणेंनी रवींद्र चव्हाण यांना पद्धतशीरपणे बाजूला केले ; माजी आमदार वैभव नाईक यांची राणेंवर खरमरीत टीका

विनायक राऊतांसोबत आम्ही सर्वजण एकदिलाने जनहिताचे काम करतोय

सिंधुदुर्ग जिल्ह्यात राणेंचे राजकीय अस्तित्व संपले असताना ज्या रवींद्र चव्हाण यांनी राणेंचे राजकीय अस्तित्व पुन्हा निर्माण करण्यासाठी मोठी रसद पुरविली. लोकसभा, विधानसभा, जिल्हा बँक निवडणुकीसाठी हि रसद देण्यात आली. परंतु आज स्वतः जिल्ह्याचा आका होण्यासाठी राणेंनी रवींद्र चव्हाण यांना पद्धतशीरपणे बाजूला केले आहे. आज रवींद्र चव्हाण आणि त्यांचे कार्यकर्ते कुठे आहेत? त्यांना कुठल्या कार्यक्रमाला बोलवले जाते? ज्यांनी राणेंना मदत केली त्यांना वेळोवेळी बाजूला फेकल्याचा राणेंचा इतिहास आहे. हे आधी लक्षात घेऊन मग नितेश राणेंनी आमच्यावर आरोप करावेत. अशी खरमरीत टीका माजी आमदार वैभव नाईक यांनी केली आहे.

 

वैभव नाईक पुढे म्हणाले, विनायक राऊत हे शिवसेनेचे नेते आहेत. विनायक राऊत यांच्यासोबत परशुराम उपरकर, राजन तेली, संदेश पारकर, बाबुराव धुरी, सतीश सावंत आणि मी स्वतः आम्ही सर्वजण एकत्र आणि एकदिलाने जनहिताचे काम करीत आहोत. जिल्ह्यातील जनतेच्या प्रश्नांवर आवाज उठवीत आहोत. सत्ताधाऱ्यांनी गेल्या सहा महिन्यात भ्रष्टाचाराचा, खंडणीचा धुडगूस घातला आहे. सत्ताधाऱ्यांकडून गुंडगिरी आणि दहशत माजविली जात आहे. त्याविरोधात आम्ही सातत्याने आवाज उठवीत आहोत. म्हणूनच जनतेचे लक्ष दुसरीकडे वळविण्यासाठी पालकमंत्री नितेश राणे हे आमच्याविषयी तथ्य नसलेली वक्तव्य करीत आहेत. खरतर आमचा पराभव होऊन स्वतः जिल्ह्याचा आका होण्यासाठी राणेंनी रवींद्र चव्हाण यांना पद्धतशीरपणे बाजूला केले ; माजी आमदार वैभव नाईक यांची राणेंवर खरमरीत टीका शिवसेनेची आम्ही सर्व मंडळी उद्धवजींच्या नेतृत्वाखाली निष्ठेने जनतेचे काम करीत आहोत. मात्र सिंधुदुर्ग जिल्ह्यात राणेंचे राजकीय अस्तित्व संपले असताना ज्या रवींद्र चव्हाण यांनी राणेंचे राजकीय अस्तित्व पुन्हा निर्माण करण्यासाठी मोठी रसद पुरविली. लोकसभा, विधानसभा, जिल्हा बँक निवडणुकीसाठी हि रसद देण्यात आली. परंतु आज स्वतःला जिल्ह्याचा आका बनविण्यासाठी राणेंनी रवींद्र चव्हाण यांना पद्धतशीरपणे बाजूला केले. आज रवींद्र चव्हाण आणि त्यांचे कार्यकर्ते कुठे आहेत? त्यांना कुठल्या कार्यक्रमाला बोलवले जाते? ज्यांनी राणेंना मदत केली त्यांना वेळोवेळी बाजूला फेकल्याचा राणेंचा इतिहास आहे. हे आधी लक्षात घेऊन मग नितेश राणेंनी आमच्यावर आरोप करावेत. अशी टीका वैभव नाईक यांनी केली असून राणेंनी आमच्यात फूट पाडण्यासाठी कितीही प्रयत्न केला तरी आम्ही सगळी मंडळी एकत्र असून ज्या ठिकाणी चुकीच्या गोष्टी घडतील त्याठिकाणी आम्ही सर्वजण ताकदीने आवाज उठविणार असे वैभव नाईक यांनी सांगितले आहे.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *