वैभववाडी (प्रतिनिधी)
साळीस्ते येथील ढोल ताशा वादन स्पर्धेत दिवटेवाडी राजापूर पथक प्रथम ; रत्नागिरी – सिंधुदुर्ग मर्यादित स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद
साळीस्ते गुरववाडी ग्रामस्थ मंडळाने आयोजित केलेल्या रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्हास्तरीय भव्य दिव्य ढोल ताशा वादन स्पर्धेत पवार मंडळी ढोल पथक दिवटेवाडी राजापूर पथकाने प्रथम क्रमांक मिळवला. या स्पर्धेत एकूण 6 नामवंत पथके सहभागी झाली होती. या स्पर्धेचे आयोजन वार्षिक उत्सवानिमित्ताने खांबेश्वर सेवा मित्र मंडळ साळीस्ते गुरववाडी यांच्यावतीने करण्यात आले होते.
या स्पर्धेचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर स्पर्धेला सुरुवात झाली. दरम्यान गावातील तसेच इतर ठिकाणच्या मान्यवरांनी उपस्थिती दर्शवली होती. या स्पर्धेचा निकाल असा –
सांघिक प्रथम – पवार मंडळी ढोल पथक दिवटेवाडी राजापूर, सांघिक द्वितीय – भावकादेवी ढोल पथक तीर्लोट, सांघिक तृतीय – रवळनाथ ढोल पथक पडेल, सांघिक उत्तेजनार्थ :– श्री जांभाई हनुमान वाद्य मंडळ जांभेवाडी पोंभुर्ले
तर उत्कृष्ट ढोल वादक – भावका देवी ढोल पथक तीर्लोट, उत्कृष्ट ताशा वादक – श्री जांभाई हनुमान वाद्य मंडळ जांभेवाडी पोंभुर्ले, उत्कृष्ट झांज वादक :– पवार मंडळी ढोल पथक दिवटेवाडी राजापूर, उत्कृष्ट निशाण नाचवणे – रवळनाथ ढोल पथक पडेल. सांघिक प्रथम तीन पथकांना रोख रुपये 8 हजार, 6 हजार आणि 5 हजार तसेच आकर्षक चषक आणि उत्तेजनार्थ पथकाला रोख रुपये 2 हजार आणि आकर्षक चषक देऊन सन्मानित करण्यात आले.
